एसटीची ट्रकला धडक; १९ प्रवासी जखमी

By admin | Published: November 1, 2016 04:58 PM2016-11-01T16:58:03+5:302016-11-01T16:58:03+5:30

गाईला वाचविण्यासाठी अचानक ब्रेक दाबून थांबलेल्या ट्रकला पाठीमागुन येणाºया एसटीने धडक दिल्याने १९ प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी

ST hits the truck; 19 passengers injured | एसटीची ट्रकला धडक; १९ प्रवासी जखमी

एसटीची ट्रकला धडक; १९ प्रवासी जखमी

Next

ऑनलाइन लोकमत

खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 01 - गाईला वाचविण्यासाठी अचानक ब्रेक दाबून थांबलेल्या ट्रकला पाठीमागुन येणाºया एसटीने धडक दिल्याने १९ प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजताचे सुमारास खामगावनजीक घडली. यामधील तीन प्रवाशी गंभीर आहेत. 

मुर्तीजापूर आगाराची एमएच४०क्यु-६४०५ क्रमांकाची एसटी खामगाव बसस्थानकावरून शिर्डीकडे रवाना झाली. दरम्यान अकोला बायपास राष्ट्रीय महामार्गावर गाईला वाचविण्याच्या नादात समोर चाललेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबले. तर पाठीमागुन येणा-या एसटी चालकानेही अचानक ब्रेक दाबल्याने एसटीचीने ट्रकला धडक दिली. या अपघातात एसटी चालकासह एकुण १९ प्रवाशी जखमी झाले. जखमींना तात्काळ स्थानिक सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये प्रभाकर शंकर साबळे (वय ४८) रा. अकोला, सुधाकर विश्वनाथ सातपुते (वय ५१) रा. खामगाव, कमरून्नीसा अ. वहाब (वय ६८) रा. खामगाव, गंगाआप्पा देवाप्पा शेटे (वय ७५) रा. खामगाव, अ.कय्युम अ.मुनाफ (वय ६५) रा.फाटकपुरा खामगाव, अलफीया कौसर (वय ७) रा. खामगाव, लक्ष्मण पुर्णाजी मोहोड (वय ६५) रा. आकतवाडा जि.अकोला, अनिता शंकर सबलकार (वय ३५) रा. अकोला, शे.शकील शे.रफीक (वय ५०) रा. बाळापुर, मंदा सिध्देश्वर हाडे (वय ४०) रा. खामगाव, प्रथमेश सिध्देश्वर हाडे (वय ५) रविंद्र प्रल्हादराव वाकोडे (वय ४१) रा. अकोला, विशाल सुरेश मोरे (वय २५) रा. खामगाव, सोहम वासुदेव निखाडे (वय ४) रा. सुटाळा ता. खामगाव, सलोनी वासुदेव निखाडे (वय ८), रा. सुटाळा, ज्योती वासुदेव निखाडे (वय २७), शंकर यशवंत सबलकार (वय ३५) रा. अकोला, एसटी चालक गोपाल मारोती मोरे रा. गोरेगाव ता. मुर्तीजापूर (वय ३०) यांचा समावेश आहे. यामधील कमलनीसा अ.वहाब, प्रथमेश हाडे व जुग्गोबी पापालाल वरसाकळे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्रथमोपचार करून अकोला येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव आगाराच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी तसेच रूग्णालयात धाव घेतली. दरम्यान भारिप-बमसं महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांनी सामान्य रूग्णालयात भेट देवून जखमींची माहिती घेतली.
 
खामगाव आगाराची जखमींना १७ हजाराची मदत
एसटीने ट्रकला पाठीमागुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात १९ प्रवाशी जखमी झाले. जखमींना स्थानिक सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी खामगाव आगाराच्यावतीने जखमींना प्रत्येकी १ हजार रूपये मदत याप्रमाणे १७ प्रवाशांना १७ हजाराचे वाटप करण्यात आले. यावेळी स्थानक प्रमुख डी.ए. दलाल, जे.व्ही. बोरले, सचिन कवळे, माणिक गोरे आदी उपस्थित होते.

Web Title: ST hits the truck; 19 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.