एसटी प्रवास एक रुपयाने महागला

By admin | Published: April 2, 2016 02:12 AM2016-04-02T02:12:09+5:302016-04-02T02:12:09+5:30

एसटी अपघातग्रस्तांना साहाय्य व्हावे यादृष्टीने निधी उभारण्यासाठी महामंडळाने प्रवाशांच्या तिकिटांवर एक रुपया शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून

ST journey costlier by one rupee | एसटी प्रवास एक रुपयाने महागला

एसटी प्रवास एक रुपयाने महागला

Next

मुंबई : एसटी अपघातग्रस्तांना साहाय्य व्हावे यादृष्टीने निधी उभारण्यासाठी महामंडळाने प्रवाशांच्या तिकिटांवर एक रुपया शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून लागू करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
तिकिटांवर शुल्क आकारण्यात आल्यानंतर त्यातून जमा होणाऱ्या निधीतून अपघातग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मृत व्यक्तीच्या वारसांना सध्या ३ लाख रुपये देण्यात येतात. यापुढे १० लाख रुपये वारसांना देण्यात येतील. तसेच जखमींना त्यांच्या उपचारासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मासिक पासधारकांना पास देतेवळी आणि पासाचे नूतनीकरण करतेवेळी ५ रुपये तर त्रैमासिक पासधारक प्रवाशांकडून पास देतेवेळी आणि नूतनीकरण करतेवेळी १५ रुपये जादा शुल्क आकारण्यात येईल. प्रासंगिक कराराच्या संपूर्ण बससाठी ५0 रुपये आणि आवडेल तेथे
प्रवास पासधारकाला ५ रुपये जादा शुल्क आकारण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ST journey costlier by one rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.