एसटी महामंडळाच्या कर्मचारी बदल्यांमध्ये सावळागोंधळ, ज्येष्ठता डावलून बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:36 AM2020-09-05T07:36:36+5:302020-09-05T07:36:45+5:30
दोन वर्षांपूर्वी मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे यादीत नाव
मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळात १५ टक्के बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ३७९ चालक आणि १०८ वाहकांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. पण या बदल्यांमध्ये सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी एका कर्मचाºयाचा मृत्यू झाला होता, त्याचे नाव बदली यादीत आहे. तर या बदल्यांत सेवाज्येष्ठता डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे.
एसटी महामंडळात गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये पालघर विभागातील गोरक्षनाथ कंठाळे या कर्मचाºयाचे नाव आहे. त्याचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता तरीही बदली यादीत नाव टाकण्यात आले आहे. काही काळापूर्वी बदली झालेल्या दहा कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. तसेच सेवा ज्येष्ठता डावलण्यात आली आहे, असा आरोप कर्मचाºयांकडून केला जात आहे. कामगार संघटनेच्या एका पदाधिकाºयाने सांगितले की, काही काळापूर्वी औरंगाबाद येथून रायगडला बदली झालेल्या कर्मचाºयाची रायगडवरून पुन्हा अहमदनगरला बदली करण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठता यादीचे नियम डावलण्यात आले आहेत. एकत्रित सेवा ज्येष्ठता नियम लावला पाहिजे, पण विभागातील सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली आहे. हा नियम पहिल्यांदा लावण्यात आला आहे. त्यामुळे इतर कर्मचाºयांवर अन्याय होत आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.
कोरोनाच्या काळात मुंबई उपगनरातील अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांना एसटी बसमधून प्रवासाची सुविधा दिली जात होती. त्या वेळी मुंबईत काम न करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्यात आली होती. आजही मुंबई, रत्नागिरी, ठाणे येथे कर्मचाºयांचा तुटवडा आहे. पण तरीही या ठिकाणच्या चालक आणि वाहकांच्या मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी बदल्या करण्याचा घाट का, असा सवाल एसटी कर्मचाºयांमधून विचारला जात आहे.
बदल्यांना तोपर्यंत तात्पुरती स्थगिती
एसटी महामंडळाने बदल्या केल्या होत्या, पण या बदल्यांमध्ये एका मृत कर्मचाºयाचे नाव होते. तसेच काही कर्मचाºयांची पुन्हा बदली करण्यात आली होती. त्यामुळे या बदल्यांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
- वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ