एसटी अधिकारी पुन्हा ‘परदेशी’

By admin | Published: October 23, 2014 04:23 AM2014-10-23T04:23:54+5:302014-10-23T04:23:54+5:30

आर्थिक संकटातील एसटीला बाहेर काढण्यासाठी अधिका-यांचे दौ-यावर दौरे होत असून आता पुन्हा एकदा परदेश दौ-याऱ्याचे वेध अधिका-यांना लागले आहेत

ST officers again 'foreigners' | एसटी अधिकारी पुन्हा ‘परदेशी’

एसटी अधिकारी पुन्हा ‘परदेशी’

Next

मुंबई : आर्थिक संकटातील एसटीला बाहेर काढण्यासाठी अधिका-यांचे दौऱ्यावर दौरे होत असून आता पुन्हा एकदा परदेश दौऱ्याचे वेध अधिका-यांना लागले आहेत. एसटीचे पाच अधिकारी केंद्राच्या एसआरटीयूतर्फे (असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) अभ्यास दौऱ्यासाठी ब्राझीलला जाण्याचे निश्चित झाले असून या दौऱ्यातून मुळात साध्य होणार तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. या वर्षातील हा दुसरा परदेश दौरा आहे.
केंद्राच्या एसआरटीयूतर्फे (असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) प्रत्येक राज्यातील एसटी महामंडळासाठी परदेशात अभ्यास दौरा आखला जातो. २0१४ मध्ये २८ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत मॅक्सिको आणि सॅन फ्रॅन्सिस्को येथे अभ्यास दौरा काढला होता. त्या वेळी एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे, राज्याचे तत्कालीन परिवहन आयुक्त व्ही.एन. मोरे तसेच राज्याचे परिवहन सचिव शैलेश कुमार शर्मा, एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापक राहिलेले आणि आता नियोजन व पणनचे महाव्यवस्थापक असलेले सूर्यकांत अंबाडेकर, एसटीच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे उपमहाव्यवस्थापक जयंत बामणे आणि मुख्य सांख्यिकी संजय गांजवे यांचा समावेश होता. हा दौरा झाल्यानंतर आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाच अधिकारी ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. यात वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी एकनाथ मोरे, वाहतूक - महाव्यवस्थापक विनोद रत्नपारखी, वरिष्ठ प्रोग्रामर- ईडीपी वीरेंद्र कदम, उपमहाव्यवस्थापक -प्रशिक्षण- (भोसरी) मिशा बंड, मुख्य अभियंता चालक आर.एम. पवनिकर यांचा समावेश आहे. महामंडळाला २0१२-१३ मध्ये २९२ कोटी तर २0१३-१४ मध्ये ४२८ कोटी आणि २0१४-१५ मध्ये ४५0 कोटी तोटा झाला आहे. तो वाढताना अभ्यास दौऱ्यातून आतापर्यंत महामंडळाने काय साध्य केले हा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ST officers again 'foreigners'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.