एसटीची रातराणी देणार खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 06:00 AM2019-02-17T06:00:00+5:302019-02-17T06:00:06+5:30

आसनी व स्लीपर अशा दोन्ही सुविधा असलेली बस पहिल्यांदाच एसटीच्या ताफ्यात येणार आहे.

ST RATRANI bus fight to private travels | एसटीची रातराणी देणार खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर

एसटीची रातराणी देणार खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर

googlenewsNext
ठळक मुद्देआसनी व शयनयान सुविधा : पहिल्यांदाच २०० बस येणार ताफ्यातआसनी तसेच स्लीपर या दोन्ही श्रेणीतील अनुक्रमे ९३९ व ९० बस राज्यातील विविध मार्गांवर प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या गाड्यांना पसंती रातराणीची भर पडणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणारखासगी ट्रव्हल्सकडून लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी एसटीच्या तुलनेत सुमारे दीड पट जादा तिकीट

- राजानंद मोरे-  
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) च्या ताफ्यात लवकरच रातराणी ही विशेष बस दाखल होणार आहे. आसनी तसेच शयनयान (स्लीपर) या दोन्ही सुविधा या बसमध्ये असून पहिल्यांदाच एसटीच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे शिवनेरी, शिवशाही पाठोपाठ आता रातराणीही खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देणार आहे. 
खासगी ट्रॅव्हल्सकडे वाढलेला प्रवाशांचा ओढा कमी करण्यासाठी एसटीकडून सातत्याने विविध प्रयत्न केले जात आहेत. सध्या एसटीकडे स्लीपर व आसनी सुविधा असलेल्या शिवनेरी, अश्वमेध व शिवशाही या स्वतंत्र बस आहेत. आता या दोन्ही सुविधा एकाच बसमध्ये असतील. त्यानुसार एसटीने अशाप्रकारच्या २०० बस घेण्याचे नियोजन केले आहे. या बस १२ मीटर लांबीच्या आहेत. त्यामध्ये ३० आसने असून १५ बर्थ (स्लीपर) आहेत. बसच्या उजव्या बाजुला प्रत्येक आडव्या रांगेत दोन तर डाव्या बाजुला एक आसन असेल. या बसची निविदा प्रक्रिया सुरू असून साधारणपणे एप्रिल महिन्याच्या अखेरीस बस ताफ्यात येऊ शकतात. या बस रातराणी म्हणून मार्गावर धावणार आहे. प्रामुख्याने लांबपल्याच्या मार्गावर रात्रीच्या वेळी या बस सोडण्याचे नियोजन असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
काही वर्षांपुर्वी वातानुकूलित शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आली. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या १२२ शिवनेरी व अश्वमेध या गाड्या एसटीच्या ताफ्यात आहेत. त्यानंतर दीड वर्षांपुर्वी आलेल्या शिवशाही बसने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले आहे. आसनी तसेच स्लीपर या दोन्ही श्रेणीतील अनुक्रमे ९३९ व ९० बस राज्यातील विविध मार्गांवर धावत आहेत. यातील काही बस भाडेतत्वावरील आहेत. आणखी सुमारे एक हजार बस घेण्याचे नियोजन आहे. शिवनेरी व शिवशाहीने एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या गाड्यांना पसंती मिळत आहे. आता त्यात रातराणीची भर पडणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 
----------------
आसनी व स्लीपर अशा दोन्ही सुविधा असलेली बस पहिल्यांदाच एसटीच्या ताफ्यात येणार आहे. या बस घेण्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू सध्या सुरू आहे. त्यामुळे बस ताफ्यात कधी येणार हे आताच सांगु शकत नाही. 
- रणजितसिंंह देओल
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
एसटी महामंडळ
------------------
आसनी व शयनयान सुविधा : पहिल्यांदाच २०० बस येणार ताफ्यात
एसटीच्या ताफ्यातील बस
साधी परिवर्तन - १४,८२० 
हिरकणी (निम आराम) - ९५४
यशवंती (मिडी बस) - २५२
मानव विकास योजनेतील बस - ८७२
शिवनेरी व अश्वमेध - १२२
शिवशाही - १०२९
शहरी वाहतुक - ४१६
-------------------
एकुण - १८,४६५
--------------------
नवीन बसचे नियोजन
साधी - ७०० (२०० विठाई)
रातराणी - २०० 
----------------
एकुण - १३००
खासगी ट्रव्हल्सकडून लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी एसटीच्या तुलनेत सुमारे दीड पट जादा तिकीट घेतले जाते. मात्र, सणासुदीच्या काळात अनेक ट्रॅव्हल्सकडून अवाजवी भाडे घेतले जाते. पण पर्याय उपलब्ध नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव हे भाडे देऊन प्रवास करावा लागतो. पण शिवनेरी व शिवशाहीमुळे अ़नेक प्रवासी एसटीकडे वळले आहेत. आता ह्यरातराणीह्ण प्रवाशांना आणखी दिलासा मिळणार असल्याचे एसटीतील अधिकाºयांनी सांगितले.
...................

Web Title: ST RATRANI bus fight to private travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.