‘एसटी’साठी अधिकारी रस्त्यावर!
By admin | Published: January 7, 2015 01:30 AM2015-01-07T01:30:49+5:302015-01-07T01:30:49+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) तोट्यात जाण्यात तिकीट चोरी हेसुद्धा एक मोठे कारण आहे.
विलास गावंडे - यवतमाळ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) तोट्यात जाण्यात तिकीट चोरी हेसुद्धा एक मोठे कारण आहे. वाहकांकडून होणारा हा प्रकार रोखण्यासाठी महामंडळातील सर्व अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. यापुढे राज्यात कुठेही बसची तपासणी केली जाणार आहे.
विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी महामंडळाने विशेष पथक निर्माण केले असले, तरी यात यश मिळत नसल्याची बाब महामंडळाच्या उशिरा लक्षात आली आहे. सातत्याने वाढणारा तोटा महामंडळ बंदच्या अवस्थेकडे नेणारा ठरत असल्याची जाणीव झाल्याने शासनाने कठोर पावले उचलली आहेत. भंगार बसेस, सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे महामंडळापासून प्रवासी दूर जात आहेत.
या बाबीला महामंडळाचा तोटा कारणीभूत आहे. परंतु तोट्याची नेमकी कारणे शोधून त्यावर मार्ग काढण्याच्या दिशेने प्रभावी असे प्रयत्न झाले नाही. आता यादृष्टीने गंभीर पावले उचलली जात आहेत. सदर अधिकारी आता मार्ग तपासणी करणार आहेत. अधिकाऱ्यांकडून कुठल्याही मार्गावर तपासणी होण्याची भीती असल्याने तिकीट चोरीच्या प्रकारांना आळा बसणार आहे.
च्विशेषत: ग्रामीण आणि आडवळणाच्या मार्गावर धावणाऱ्या बसफेऱ्यांमध्ये हा प्रकार प्रामुख्याने चालतो.
च्शिवाय जवळच्या गावाचा प्रवास करणाऱ्या व्यक्तीला तिकीट दिले जात नाही. आता कुठेही तपासणी होणार असल्याने चोरीचा प्रकार थांबेल आणि भारमानात वाढ होईल, असे सूत्रांनी सांगितले.