एसटी पूर्ण क्षमतेने सुरू; पण, प्रवाशांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 07:23 AM2020-09-22T07:23:33+5:302020-09-22T07:23:59+5:30

अनिल परब; पाच महिन्यांत ३,५०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी

ST starts at full capacity; But, the passenger's back | एसटी पूर्ण क्षमतेने सुरू; पण, प्रवाशांची पाठ

एसटी पूर्ण क्षमतेने सुरू; पण, प्रवाशांची पाठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सध्या १०० टक्के क्षमतेने एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे; पण प्रवासी अजूनही प्रवासासाठी धजावत नाहीत, असे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी सांगितले.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे एसटीची चाकेही थांबली. आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटीच्या तोट्यात आणखी भर पडली. २० आॅगस्टपासून ५० टक्के क्षमतेने राज्यांतर्गत एसटी सेवा सुरू झाली. त्यानंतर १७ सप्टेंबरपासून १०० टक्के क्षमतेने एसटी वाहतूक सुरू केली आहे. परिवहनमंत्री म्हणाले, राज्यात एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली तरी प्रवासी अजूनही प्रवासास धजावत नाहीत.
कोरोनाचा भत्ता द्यायचा शिल्लक आहे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत देणे बाकी आहे, हे लवकर आम्ही देऊ असेही त्यांनी सांगितले. एसटी कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आली आहे. ५ हजार कोटी रुपये संचित तोटा असणाऱ्या एसटीला कोरोना काळात गेल्या पाच महिन्यांमध्ये तिकीट विक्रीतून मिळणाºया हक्काच्या ३५०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.
एकूण महसुलाच्या तिकीट विक्रीच्या माध्यमातून ९८ टक्के महसूल एसटीला प्राप्त होतो. परंतु सध्या प्रवाशांचा ओघही कमी असल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे.
राज्य सरकारकडे २२०० कोटींची मागणी
एसटीला दोन महिने उत्पन्न नसले तरी राज्य सरकारकडून ५०० कोटी रुपये घेऊन पगार दिले होते. आताही आम्ही राज्य सरकारकडे २२०० कोटींची मागणी केली आहे. इंधन, पगार, सुटे भाग यासाठी पैसे मागितले आहेत. यातील ५५० कोटी मिळाले असून उर्वरित लवकरच मिळतील, असे परिवहनमंत्री म्हणाले.

Web Title: ST starts at full capacity; But, the passenger's back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.