किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दाचा मान राखा; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा अनिल परबांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 10:21 AM2022-01-11T10:21:13+5:302022-01-11T10:21:44+5:30

अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल असं त्यांनी सांगितले.

ST Strike: At least respect Uddhav Thackeray's word; BJP MLA Gopichand Padalkar taregt Anil Parab | किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दाचा मान राखा; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा अनिल परबांना टोला

किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दाचा मान राखा; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा अनिल परबांना टोला

googlenewsNext

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही काही तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून आझाद मैदानात कर्मचाऱ्यांचं आंदोलन कायम आहे. या आंदोलनावरुन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना टोला लगावला आहे. आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? असा सवाल पडळकरांनी अनिल परब यांना केला आहे.

याबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले की, आज सर्वात पहिले सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी एकजूटीनं लढा दिला. कुठल्याही युनियनचे सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरद पवारांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल असं त्यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा, चर्चा करा आणि यावर तोडगा काढा असा सल्लाही गोपीचंद पडळकरांनी अनिल परब यांना दिला आहे.

संप मागे घेण्यासाठी शरद पवारांनी केले आवाहन

कामगार व प्रवाशांचे हित आणि एसटी टिकली पाहिजे, असा कृती समितीचा आग्रह असून, संप मागे घेण्याच्या त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कर्मचाऱ्यांना केले. आपली बांधिलकी प्रवाशांशी आहे. आधी एसटी रस्त्यावर आणा, मग बाकीचे बघू अशी भूमिकाही त्यांनी मांडली. एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी २२ कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. शरद पवार यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब, विभागाचे अधिकारी आणि कृती समितीचे प्रतिनिधी यावेळी  उपस्थित होते. शरद पवार यांनी एसटीचा संप मिटविण्यासाठी कृती समितीमध्ये एकमत घडविले. कृती समितीने सरकारच्या निर्णयात ज्या काही त्रुटी दाखवून दिल्या आहेत, त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी परिवहन मंत्र्यांनी दाखवली.

Web Title: ST Strike: At least respect Uddhav Thackeray's word; BJP MLA Gopichand Padalkar taregt Anil Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.