तीन हजार एसटी कर्मचारी कामावर परतले; दिवसभरात २० वेगवेगळ्या ठिकाणांहून ७१ बस सोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 07:47 AM2021-11-14T07:47:50+5:302021-11-14T07:48:56+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत. शनिवारी ही तीन हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. शनिवारी २० वेगवेगळ्या ठिकाणांहून ७१ बस सोडण्यात आल्या असून दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप विरोधात एसटी महामंडळाने उच्च न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही कर्मचारी आंदोलनावर ठाम राहिले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील खासगी बस संघटनांना राज्यातील विविध बस स्थानकाहून बस गाड्या सोडण्याची परवानगी देण्यात आली होती.
जे एसटी कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत. त्यांनाही पोलीस संरक्षण देऊन तीन हजार कर्मचारी शनिवारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे शनिवारी राज्यभरातील २० ठिकाणाहून एकूण ७१ बस सोडण्यात आल्या आहेत. या बसमधून १ हजार ९३६ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
एसटी कर्मचारी स्थिती
प्रवर्ग हजेरी हजर संपातील
पटावरील कर्मचारी कर्मचारी
कर्मचारी
प्रशासकीय ९४२६ २२६५ ६८४९
कार्यशाळा १७५६० ७५८ १५९५६
चालक ३७२२५ १११ ३६७५६
वाहक २८०५५ ३२ २७०२३
एकूण ९२२६६ ३१६६ ८६५८६
nप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील खासगी बस संघटनांना राज्यातील विविध बस स्थानकाहून बस गाड्या सोडण्याची परवानगी दिली होती.