एसटी टोलमुक्त करणार

By admin | Published: January 1, 2015 03:11 AM2015-01-01T03:11:32+5:302015-01-01T03:11:32+5:30

एसटीला मोठ्या प्रमाणात टोलचा भुर्दंड पडत असून, त्यातून मुक्ती देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

ST toll free | एसटी टोलमुक्त करणार

एसटी टोलमुक्त करणार

Next

मुंबई : एसटीला मोठ्या प्रमाणात टोलचा भुर्दंड पडत असून, त्यातून मुक्ती देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. एसटीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी एसटीच्या मुख्यालयास भेट दिली. त्यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत रावते यांनी ही माहिती दिली.
यावेळी बैठकीत एसटीचे प्रभारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच परिवहन आयुक्त महेश झगडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व बस स्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेस प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी एसटी अधिकाऱ्यांना केली. अपघातग्रस्त प्रवाशांच्या भरपाईमागे एसटी वर्षाला ४0 कोटी रुपये भुर्दंड पडत आहे. हा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी प्रवाशांचा विमा काढण्याचा पर्याय एसटी अधिकाऱ्यांनी शोधावा. एखाद्या विमा कंपनीला याचे काम दिल्यास एसटीला त्याचा हफ्ता किती बसेल याची माहिती घ्यावी आणि त्यादृष्टीने पाऊल उचलण्यात यावे, अशी सूचनाही करण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे मार्गावरील बसमध्ये लवकरच सीएनजीच्या वापराबाबत कार्यवाही करावी, ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी बसच्या बांधणीत बदल करून सामान ठेवण्यासाठी विशेष कप्पा तयार करता येतो का याची चाचपणी केली जावी, अशा सूचनाही परिवहन मंत्र्यांकडून एसटी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

इथेनॉलचा वापर डिझेलसाठी...
राज्यातील साखर कारखान्यातून मोठ्या प्रमाणात इथेनॉल बाहेर पडतो. या इथेनॉलच्या वापरातून डिझेलचा पर्याय शोधण्यात यावा, अशी एक महत्त्वाची सूचना रावते यांनी केली.
सौरऊर्जा वापरा
वीज वापरावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खर्चात कपात करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करावा, एसटीच्या बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्त्वावरील नवीन प्रकल्पास स्थगिती देत यापुढे एसटीच्या हितास प्राधान्य देणाऱ्या प्रकल्पांचा विचार होणार असल्याचे रावते यांनी सांगितले.

 

Web Title: ST toll free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.