एसटी कामगारांचे मोर्चे मंत्रालयावर धडकणार

By Admin | Published: December 31, 2016 03:03 AM2016-12-31T03:03:28+5:302016-12-31T03:03:28+5:30

नवीन वेतन करार अमलात आणावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, १ एप्रिल २0१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी एसटीतील कामगार

ST workers will be hit on the front ministry | एसटी कामगारांचे मोर्चे मंत्रालयावर धडकणार

एसटी कामगारांचे मोर्चे मंत्रालयावर धडकणार

googlenewsNext

मुंबई : नवीन वेतन करार अमलात आणावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, १ एप्रिल २0१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी एसटीतील कामगार संघटनांनी मंत्रालयावरच मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून ३ जानेवारीला हल्ला बोल मोर्चा तर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून २0 जानेवारी रोजी धडक मोर्चा काढला जाणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची मुदत ३१ मार्च २0१६ रोजी संपली आहे. त्यामुळे १ एप्रिल
२0१६ पासून नवीन वेतन करार अमलात येणे गरजेचे होते. यात एसटी प्रशासनाकडून पगारवाढीसाठी नेमलेल्या वेतन सुधार समितीला फेब्रुवारी २0१७ पर्यंत मुदतवाढ देऊन टाळाटाळ चालली असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आला. तुटपुंज्या पगारात एसटी कामगारांना आपला संसार चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्वरित पगारवाढ होणे गरजेचे असतानाही त्याकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्वरित पगारवाढ द्या किंवा ३0 टक्के अंतरिम वाढ द्या या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून ३ जानेवारी २0१७ रोजी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने एसटी व्यवस्थापनाकडे १ एप्रिल
२0१६ पासून वाढीव वेतन मिळवण्यासाठी मागण्यांचा मसुदा सादर केलेला आहे. सादर केलेल्या मागणी मसुद्यामध्ये एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू
करा, जेणेकरून कामगारांना भरीव आर्थिक मदत मिळेल. तसेच
एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी शासनात विलीन करा, १ एप्रिल
२0१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ लागू करा, कनिष्ठ वेतनश्रेणी लागू करा, शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व एसटी कामगारांचे वेतन यामधील तफावत दूर करा इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी महामंडळाकडे सादर केल्या आहेत. या मागण्यांची सोडवणूक करण्यास शासनाने टाळाटाळ केल्यास बेमुदत संपासह कोणतेही आंदोलन करण्याचा
निर्णय संघटनेने घेतला आहे.
त्याचाच पहिला टप्पा म्हणून २0 जानेवारीला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

मागण्यांसंदर्भात एसटी महामंडळाशी बैठकही घेण्यात आली. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन करण्यावर आम्ही ठाम आहोत.
- श्रीरंग बरगे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस-सरचिटणीस
सातवा वेतन आयोग आणि २५ टक्के अंतरिम वाढ लागू करा या मागणीसह अन्य मागण्या केल्या असून त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. यासाठी धडक मोर्चा काढणार आहोत. तरीही तोडगा निघाला नाही तर बेमुदत संप हाच एक पर्याय राहील.
- हनुमंत ताटे, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना-जनरल सेक्रेटरी

Web Title: ST workers will be hit on the front ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.