बच्चू कडू यांच्या सभेवेळी स्टेज कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:14 AM2019-02-25T06:14:01+5:302019-02-25T06:14:28+5:30

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिषद रविवारी येथे झाली.

The stage collapsed at the meeting of bachu Kadu | बच्चू कडू यांच्या सभेवेळी स्टेज कोसळले

बच्चू कडू यांच्या सभेवेळी स्टेज कोसळले

नाशिक : कांद्यांच्या संदर्भातील केंद्र सरकारचे धोरण हे शेतकरी हिताचे अजिबातच नाही. भाव न मिळण्याचे प्रकार वारंवार झाल्यानंतरही सरकारला जाग येत नसेल आणि कांद्याला जीवनाश्यक वस्तूंंच्या यादीतून वगळणार नसेल तर प्रसंगी दिल्लीचे तख्तही हलविण्याची आमची ताकद आहे, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली. भाषण आटोपल्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरत असताना स्टेजचा एक भाग कोसळला. मात्र बच्चू कडू यांना काही इजा झाली नाही. व्यासपीठावरील काही पदाधिकारी पडले, ते किरकोळ जखमी झाले.


प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिषद रविवारी येथे झाली. शेतकºयांच्या बाबतीत सरकारची भूमिका विरोधाची राहिली आहे. आश्वासन द्यायचे मात्र त्याची अंमलबजावणी करायची नाही, या भूमिकेमुळे सरकारने शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळी आणली, असा आरोप त्यांनी केला. परिषदेसाठी जिल्हाभरातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लांबलचक व्यासपीठावर चांगलीच गर्दी झाली होती.


दानवेंचा पराभव हेच ध्येय, तर खोतकर यांना पाठिंबा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकºयांबाबत अपशब्द वापरल्याचे सांगत त्यांचा पराभव हेच आपले सर्वांत मोठे ध्येय असल्याचा पुनरुच्चार कडू यांनी केला. दानवे यांच्या पराभवासाठी आपण काहीही करण्यास तयार असून, अर्जून खोतकर यांनी दानवेंविरोधात उमेदवारी केली, तर प्रसंगी त्यांना पाठिंबा देऊ, असे ते म्हणाले.

 

Web Title: The stage collapsed at the meeting of bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.