मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उभारलेलं आमदार सत्तारांचं स्टेज पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 12:46 PM2019-08-28T12:46:54+5:302019-08-28T12:49:19+5:30

वाद होऊ शकतो म्हणून पोलिसांनी दोन स्टेजची परवानगी नाकारली होती.

The stage was captured by the Chief Minister program | मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उभारलेलं आमदार सत्तारांचं स्टेज पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उभारलेलं आमदार सत्तारांचं स्टेज पोलिसांनी घेतलं ताब्यात

googlenewsNext

श्यामकुमार पुरे 

औरंगाबाद (सिल्लोड ) - आमदार अब्दुल सत्तार आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वाद मंगळवारी पुन्हा पाहायला मिळाला . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यात आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजप आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून तयारी करण्यात आली होती. तर अब्दुल सत्तार यांनी प्रियदर्शनी चौकात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी स्टेज लावला होता.मात्र त्यांच्या स्टेजला भाजपकडून विरोध होत असल्याने पोलिसांनी कार्यक्रमाची परवानगी नाकारत सत्तार यांनी उभारलेला स्टेज ताब्यात घेतला आहे.

आमदार सत्तार यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यांनतर ते भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांना सिल्लोड मध्ये होत असलेला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध पाहता मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना वेटिंग वर ठेवले होते. आज सिल्लोडमध्ये महाजनादेश यात्रा निमित्ताने हा वाद पुन्हा समोर आला आहे. सत्तार यांनी सिल्लोड शहरातील प्रियदर्शनी चौकात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी स्टेज उभारला होता. मात्र स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केल्याने पोलिसांनी सत्तार यांनी उभारलेला स्टेज ताब्यात घेतला आहे. त्यामुळे सत्तार यांची गोची झाली असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजप आणि सत्तार यांनी वेगवेगेळे स्टेज उभा करण्याचे नियोजन केले होते. मात्र त्यामुळे वाद होऊ शकतो म्हणून पोलिसांनी दोन स्टेजची परवानगी नाकारली होती. मात्र आता सत्तार यांना स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होत, असलेला विरोध लक्षात घेत पोलिसांनी खबरदारी म्हणून स्टेजवर होणारा कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सिल्लोडमध्ये आज राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळाले.

Web Title: The stage was captured by the Chief Minister program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.