...हा डाग चांगला आहे ! मतदानाची स्मार्ट जागृती

By admin | Published: February 16, 2017 02:34 PM2017-02-16T14:34:42+5:302017-02-16T14:34:42+5:30

व्हॉट्स अ‍ॅप डीपी :‘अधिकार नव्हे राष्ट्रीय कर्तव्य’,

This stain is good! Smart awareness of voting | ...हा डाग चांगला आहे ! मतदानाची स्मार्ट जागृती

...हा डाग चांगला आहे ! मतदानाची स्मार्ट जागृती

Next

नाशिक : ‘हा डाग तुम्हाला कलंकित नाही तर मानांकित करणार आहे... हा डाग चांगला आहे...’ अशा प्रकारचे प्रबोधन करणारे ‘डीपी’ सध्या व्हॉटस्अ‍ॅपच्या विविध ग्रूप व व्यक्तींचे दिसू लागले आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूकांचे मतदान अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने मतदानाची ‘स्मार्ट’ जनजागृती केली नेटिझन्स्कडून केली जात आहे.
महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूकांची सध्या रणधुमाळी शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. नाशिक शहरात महापालिका हद्दीत सुमारे साडे दहा लाख मतदार असून या मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजवावा यासाठी सर्वच स्तरातून जनजगृती केली जात आहे. मतदान ही लोकशाहीची खरी ताकद असून मतदानाचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने पार पाडावे, असे अवाहन महापालिका, जिल्हा परिषद, निवडणूक आयोग, विविध सामाजिक संघटनांकडून केले जात आहे. या जागृती अभियानामध्ये सोशल मिडियाही मागे राहिला नसून मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने सध्या व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल साइट्सवरून ‘हा डाग चांगला आहे...’ अशी पोस्ट सध्या गाजत आहे. बहुतांश नेटीझन्सकडून ही पोस्ट ‘डीपी’म्हणून अपडेट करण्यात आली आहे.

Web Title: This stain is good! Smart awareness of voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.