मुख्यमंत्र्यांच्या ट्रॅपमध्ये अडकला लाचखोर सचिव

By admin | Published: April 2, 2015 05:16 AM2015-04-02T05:16:14+5:302015-04-02T05:16:14+5:30

विधी व न्याय विभागाचे अवर सचिव मिलिंद कदम यांना ४ लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या

Stalked by the Chief Minister's Trap Striker secretary | मुख्यमंत्र्यांच्या ट्रॅपमध्ये अडकला लाचखोर सचिव

मुख्यमंत्र्यांच्या ट्रॅपमध्ये अडकला लाचखोर सचिव

Next

मुंबई : विधी व न्याय विभागाचे अवर सचिव मिलिंद कदम यांना ४ लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार रंगेहाथ पकडले. लाचखोर अधिकाऱ्याला थेट मुख्यमंत्र्यांनीच पकडून दिल्याने मंत्रालयात खळबळ उडाली आहे.
विधी व न्याय विभागाचे अवर सचिव कदम यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना संबंधित विभागचे ब्रिफिंग देण्याची जबाबदारी
होती. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री कार्यालयात येणे जाणे होते. आर्वी (जि. वर्धा) येथील एका वकिलाची नोटरी म्हणून नियुक्ती
अंतिम करण्यात आल्याची माहिती
कदम याला मिळाली होती. त्याने त्या वकिलाशी वारंवार संपर्क साधला आणि तुम्हाला नोटरी म्हणून नियुक्त मिळवून देतो, असे सांगितले. त्या वकिलांना मुंबईत बुधवारी बोलावून घेतले.
दरम्यान, मुख्यमंत्र्याशी परिचय असलेल्या या वकिलाने कदमबाबत मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली. त्यावर मुख्यमंत्र्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यास सांगितले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी चर्चा केली. वकिलाचे कदमशी दुपारी बोलणे
झाले आणि सायंकाळी रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार वकील आणि कदम
यांची सीएसटी जवळील शिवाला हॉटेलमध्ये भेट झाली.
आपल्याकडे सध्या ५० हजार रुपये आहेत. बाकीची रक्कम उद्या देतो, असे वकीलाने सांगितले. कदम हॉटेल बाहेर आला. त्याने चालता चालता वकिलांकडून पैसे घेतले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Stalked by the Chief Minister's Trap Striker secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.