मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर : महसूलमंत्री

By जयदीप दाभोळकर | Published: January 1, 2021 05:56 PM2021-01-01T17:56:39+5:302021-01-01T18:00:57+5:30

चार महिन्यात दस्तनोंदणीत तब्बल ४८ टक्के तर महसुलात ३६७ कोटी रुपयांची झाली वाढ

Stamp duty cut boosts construction state economy on track maharashtra Revenue Minister balasaheb thorat | मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर : महसूलमंत्री

मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर : महसूलमंत्री

Next
ठळक मुद्देसप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत २०१९ च्या तुलनेत राज्याच्या महसुलात ३६७ कोटी रुपयांची वाढबांधकाम क्षेत्राला चालना मिळाल्यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती आल्याची थोरात यांची माहिती

"कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करनारानाही मोठा फायदा झाला आहे. मुद्रांक शुल्कात सरसकट ३ टक्के सवलत दिली गेली. या सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही महसूल जमा झाला," अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१९ च्या तुलनेत दस्तनोंदणीत ४८ टक्के तर राज्याच्या महसुलात ३६७ कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने व उद्योगक्षेत्राने गती पकडली असल्याचेही ते म्हणाले.

"बांधकाम क्षेत्रात आलेली मंदीचे सावट दूर करुन या क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच घर खरेदी करणारे या दोघांचे हित लक्षात घेऊन मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन मरगळलेल्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे केंद्र सरकारनेही कौतुक केले असून इतर राज्य सरकारांनीही महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करावे," असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

डिसेंबरमध्ये महसूलात ५९ टक्क्यांची वाढ

डिसेंबर २०१९ मध्ये २ लाख ३९ हजार २९२ दस्तनोंदणीसह २ हजार ७१२ कोटींचा असलेला महसूल डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ४ लाख ५९६०७ दस्त नोंदणी होऊन ४ हजार ३१४ कोटींचा महसूल प्राप्त झाला, डिसेंबरमधील दस्त नोंदणीत तब्बल ९२ वाढ टक्के तर महसूलात ५९ टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात २०१९ साली ८ लाख ४४ हजार ६३६ दस्त नोंदणी होऊन महसूल ९ हजार २५४ कोटी रुपये मिळाला होता. तर २०२० मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात १२ लाख ५६ हजार २२४ दस्त नोंदणी झाली आणि ९ हजार ६२२ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यात दस्त नोंदणीत ४८ टक्के वाढ तर महसुलात ३.९७ टक्के वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली.

मुद्रांक शुल्कात घट झाल्याचा फायदा

"महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला दिलेल्या दिलास्यामुळे या क्षेत्रातील मरगळ जाऊन पुन्हा या क्षेत्रात मोठी उलाढाल झाली आहे. मुंबई, पुणे या मोठ्या शहराबरोबरच इतर शहरी भागातही घर खरेदीचे करणाऱ्यांचे स्वप्न या मुळे पूर्ण झाले. विशेषतः मोठ्या शहरात घर खेरदीच्या किंमतीमुळे मुद्रांक शुल्कची लाखात भरावा लागत होता. त्यात घट केल्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही खिळ बसली होती. महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केल्याने तिजोरीत पैसा येणास मदत झाली व ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांचाही फायदा झाला," असे महसूलमंत्री म्हणाले.
 

Web Title: Stamp duty cut boosts construction state economy on track maharashtra Revenue Minister balasaheb thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.