पंढरपूरात दर्शनासाठी उभ्या असलेल्या रांगेत चेंगराचेंगरी
By admin | Published: July 5, 2016 07:25 PM2016-07-05T19:25:48+5:302016-07-05T21:11:40+5:30
स्काय वॉक च्या अर्धवट कामामुळे इतिहासात पहिल्यांदा मंदिराची उलट दिशेने नामदेव पायरीकडे आली. केवळ नियोजन नसल्यामुळे रांग रस्त्यावर वाटेल तिकडे वाढत गेली.
Next
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ५ :
स्काय वॉक च्या अर्धवट कामामुळे इतिहासात पहिल्यांदा मंदिराची उलट दिशेने नामदेव पायरीकडे आली. केवळ नियोजन नसल्यामुळे रांग रस्त्यावर वाटेल तिकडे वाढत गेली. अतिशय अरुंद गल्लीतून रांग आली त्यावेळी एकेरी रांग मोडली व भाविकांचा पुढे जाण्यासाठी जणू पायी पालखी सोहळ्यातील धावा दुरु झाला आणि अरुंद गल्लीतील दर्शनबारी ब्लॉक झाली दोन- चार पोलिसानी रांग थांबविण्याचा प्रयत्न केला खरा मात्र ती रांग पोलिसाना ढकलून रांग पुढे गेली त्यात काही जण खाली पडले, तर शेकडो भाविक चेंगरले. तब्बल दीड तास रांग ब्लॉक झाल्याने भाविक वैतागले त्यातच काहींची चुकामूक झाली. वास्तविक स्काय वॉक चे काम किमान दोन महिने आधी सुरु केले असते तर कदाचित ही अवस्था झाली नसती मात्र हे शहाणपण नगरपालिका आणि मंदिरसमितीला शिकविणार कोण?