विनाहेल्मेट दुचाकीजवळ उभे राहाणेही ‘गुन्हा’!
By admin | Published: April 24, 2017 03:19 AM2017-04-24T03:19:41+5:302017-04-24T03:19:41+5:30
शहरात सुरू असलेल्या ‘ई- चलान’ प्रणालीतील त्रुटींमुळे काही वाहनचालकांना नाहक डोकेदुखी होते आहे. वाहन विकले असतानाही
नागपूर : शहरात सुरू असलेल्या ‘ई- चलान’ प्रणालीतील त्रुटींमुळे काही वाहनचालकांना नाहक डोकेदुखी होते आहे. वाहन विकले असतानाही पहिल्या मालकालाच चलान येणे, उभ्या दुचाकीवर बसून केवळ मोबाइल पाहिला म्हणून फोटोसह चलान येणे, असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे लोकांना वाहतूक पोलिसांकडे नाहक चकरा माराव्या लागत
आहेत.चिखली चौक येथील वाहन पार्किंगमध्ये एक युवती दुचाकीवर बसली होती. याचदरम्यान तिचा मोबाइल वाजला. तिने फोन पाहिला असता चौकातील वाहतूक पोलिसांनी तिचा फोटो काढून घेतला आणि तिला ई-चलान पाठविले. ५०० रुपये दंड भरा अथवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असे हे चलान आहे.
दुसऱ्या प्रकरणात, सतीश मोहोड यांनी चार वर्षांपूर्वी त्यांची दुचाकी विकली, नियमानुसार दुचाकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली. तरीही नवीन मालक ही दुचाकी ओमकार नगर चौकात विनाहेल्मेट चालवित असताना ई -चलान मोहोड यांनाच पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)