स्टार्सच्या हेअरकटचा स्टायलिश ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 09:43 PM2017-05-18T21:43:13+5:302017-05-18T21:43:13+5:30

आॅनलाईन लोकमत /नवनाथ खराडे अहमदनगर, दि. 18 - स्टार्सच्या स्टाईलला फॉलो करीत केसांची आकडे काढणारी, दाढीला वेगवेगळी वळणे देणाऱ्या हेअरकटचा ...

Star's Haircut's Stylish Trend | स्टार्सच्या हेअरकटचा स्टायलिश ट्रेंड

स्टार्सच्या हेअरकटचा स्टायलिश ट्रेंड

Next

आॅनलाईन लोकमत /नवनाथ खराडे

अहमदनगर, दि. 18 - स्टार्सच्या स्टाईलला फॉलो करीत केसांची आकडे काढणारी, दाढीला वेगवेगळी वळणे देणाऱ्या हेअरकटचा स्टायलिश ट्रेंड आता खेडोपाडीही रुजू लागला आहे़ या स्टायलिश ट्रेंडला कलरिंगने अधिक चकाकी लाभल्यामुळे १४ ते २२ वर्ष वयोगटाच्या यंगिस्तानने हा न्यू ट्रेंड अक्षरश: डोक्यावर घेतला आहे़
पूर्वी चित्रपटातील हिरोची हेअरस्टाईल करण्याकडे तरुणाईचा कल असायचा़ मात्र, आता क्रिकेटची लोकप्रियता शिगेला पोहोचल्यामुळे क्रिकेटर्सची हेअर स्टाईल आपल्या डोक्यावर चढविण्याची जणू स्पर्धाच तरुणाईमध्ये लागल्याचे पहावयास मिळत आहे़ तरुणाईचा कल पाहूनच यंदाच्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये मोस्ट स्टायलिश प्लेअर हा अवॉर्ड सुरु झाल्याचे सांगण्यात येते़ तथापि, तरुणाईमध्ये विराट कोहली, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, अ‍ॅडम झंपा, युवराजसिंग यांच्यासारखी हेअरस्टाईल तरुणामध्ये लोकप्रिय झाली आहे़
सद्यस्थितीत हेअरकटचे विविध प्रकार असले तरी त्यामधील सर्वात जास्त वन साईड कटला युवक प्राध्यान देत आहेत. यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. वन साइड कटमध्ये एका बाजूचे केस कमी केले जातात. उर्वरित केस दुसऱ्या बाजूला वळविले जातात. टू साइड कटमध्ये दोेन्ही बाजूचे केस कमी करुन मधले केस कमी- जास्त ठेवले जातात. ग्रास कटमध्ये केस उभे ठेवले जातात. युनिफॉर्म कटमध्ये सर्व केस एकसारखे कापले जातात. गॅ्रज्यूएशन कटमध्ये केसांना स्लोप दिला जातात. या कटवरच तरुणाई समाधान मानत नाही तर जोडीला केसांना कलरिंगही केले जाते. झॅकपॅक हेअरकट केल्यानंतर त्यावर कलरची फिनिशिंग करुन लूक चेंज करण्याकडेही अनेकांचा कल वाढत आहे़
कलरिंगमध्ये हायलाईट, लो-लाईट, ग्लोबल व टचअप हे महत्वाचे प्रकार आहेत. हायलाईटमध्ये डार्क केसांच्या काही बट लाईट कलर केल्या जातात. लोलाईट प्रकारात लाईट केसांमध्ये काही बट डार्क केल्या जातात. ग्लोबल प्रकारात सर्व केसांना एकसारखा कलर केले जाते. रुट टच अप प्रकारात दोन-तीन महिन्यांपूर्र्वी कलर केले असल्यास फक्त केसांच्या मुळांना कलर केले जाते. डार्क प्रकारात ब्लॅक, डार्क ब्राऊन, ब्राउन, लाईट ब्राऊन हे कलर वापरण्यास तरुणाई पसंती देत आहे. लाईटमध्ये ब्लॉड, लाईट ब्लॉड, व्हेरी लाईट ब्लॉड असे कलरही तरुणाईला भावत आहेत़ हायलाईटमध्ये रेड, रेड व्हायलेट, चॉकलेट, वॉर्म व अ‍ॅश कलरने तरुणाईला भुरळ पाडली आहे़
केसांना आणखी स्टायलिश करण्यासाठी कलरशिवाय आणखी बाबीचा वापर तरुणाई करत आहे. त्यामध्ये जेलचा वापर केला जातो. केसांना उभे किंवा कडक ठेवण्यासाठी जेल उपयोगात आणले जाते. तसेच व्हॅक्स, प्लाय, मूस याचाही उपयोग केसांना चमकदार बनवण्यासाठी व लूक देण्यासाठी वापर केला जातो. हेअर स्प्रेचा वापर करुन हव्या त्या दिशेला केस वळविले जातात. तसेच धुळीपासून, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सिरमचा वापर तरुणाई करते. सिरममुळे केसांमध्ये गुंता होत नाही. याशिवाय दररोज केसांच्या काळजीसाठी शाम्पू, कंडिशनर, स्पा व कलरकेअरचाही वापर केला जातो.
आधुनिकतेबरोबर कटींगच्या व्यवसायातही मोठे बदल झाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कटची मागणी केली जाते. त्यानुसार आम्ही सेवा देतो. स्टायलिश व कलरिंगचे सर्र्वाधिक प्रमाण तरुणाईमध्ये आहे़ अनेकजण व्यक्तिमत्व चांगले दिसण्यासाठी स्टायलिश कटींगला पसंती देतात़ नगरमध्ये हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असे हेअर डिझायनर सागर औटी यांनी सांगितले़

https://www.dailymotion.com/video/x844z7u

Web Title: Star's Haircut's Stylish Trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.