खटला सुरू करा

By admin | Published: April 11, 2017 01:20 AM2017-04-11T01:20:46+5:302017-04-11T01:20:46+5:30

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी माझ्यावर दोषारोपपत्र दाखल असलेला खटला लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी डॉ. वीरेंद्र तावडे याने सोमवारी

Start the case | खटला सुरू करा

खटला सुरू करा

Next

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी माझ्यावर दोषारोपपत्र दाखल असलेला खटला लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी डॉ. वीरेंद्र तावडे याने सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केली.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी झाली. पुण्यातील
येरवडा कारागृहातील डॉ. तावडे याच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी त्याचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन उपस्थित होते.
पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘सनातन’चा साधक संशयित डॉ. वीरेंद्र तावडे
याला एसआयटीच्या पथकाने
२ सप्टेंबर २०१६ रोजी ‘सीबीआय’कडून ताब्यात घेऊन त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर तो पुण्याच्या येरवडा कारागृहात ‘सीबीआय’च्या ताब्यात आहे.
न्यायाधीश बिले यांनी, व्हिडिओ कॉन्फरन्सवर दिसणाऱ्या व्यक्तीची, ‘डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे
तुम्हीच का?’ अशी ओळख परेड घेतली. तुम्हाला प्रशासकीय अडचणींमुळे न्यायालयात हजर
करता आले नसल्याचेही न्यायाधीशांनी त्याला सांगितले. तुमच्यावर आरोप निश्चितीबाबत सुनावणीला उच्च न्यायालयाने
५ जुलैपर्यंत स्थगिती दिल्याचे सांगितले तरीही तुमच्याशी
बोलावे म्हणून ‘व्ही.सी.’द्वारे समोरासमोर आहे.
तुमचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन येथे असून तुम्हाला खटल्याबाबत
काय सांगायचे आहे का? असेही विचारले. त्यावेळी डॉ. तावडे याने
हा खटला लवकरात लवकर सुरू
करा, अशी विनंती न्यायाधीशांकडे केली. (प्रतिनिधी)

२० एप्रिलला उच्च न्यायालयात अहवाल
पानसरे हत्याप्रकरणी तपासातील प्रगतीचा अहवाल एसआयटीमार्फत (विशेष पथक) २० एप्रिलला उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्यातील तपासातील प्रगतीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करणे ‘एसआयटी’ला बंधनकारक आहे.

Web Title: Start the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.