अंबाबाई मंदिर स्वच्छतेला प्रारंभ

By admin | Published: October 5, 2015 03:29 AM2015-10-05T03:29:12+5:302015-10-05T03:29:12+5:30

नवरात्रौत्सवानिमित्त गेल्या 11 वर्षांपासून अंबाबाई मंदिर स्वच्छतेची शनिवारपासून या कामाचा प्रारंभ करण्यात आला.

Start of cleanliness of Ambabai temple | अंबाबाई मंदिर स्वच्छतेला प्रारंभ

अंबाबाई मंदिर स्वच्छतेला प्रारंभ

Next

  कोल्हापूर : नवरात्रौत्सवानिमित्त गेल्या 11 वर्षांपासून अंबाबाई मंदिर स्वच्छतेची शनिवारपासून या कामाचा प्रारंभ करण्यात आला. ह्य अंबा माता की जय म्हणत सुरूझालेल्या स्वच्छतेपासून देवीच्या उत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत.अिंबाबाईवर ह्यश्रद्धा आणि भक्ती असणारे अनेक भक्त आपल्यापरीने तिच्या चरणी आपली सेवा देत असतात. मुंबईच्या संजय खानविलकर यांनी आपल्या संजय मेंटेनन्सद्वारे गेल्या 11 वर्षांपासून मंदिराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली आहे. दिेवस्थानकडून एक रुपयाचीही अपेक्षा न ठेवता नवरात्रौत्सवाच्या आधी दहा दिवस संस्थेचे कर्मचारी आधुनिक यंत्रसामग्री घेऊन कोल्हापुरात दाखल होतात आणि मंदिराचा कोपरा न कोपरा स्वच्छ करतात. यिंदाच्या नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने संजय माने यांच्यासह 18 जणांच्या टीमने शनिवारी सकाळपासून स्वच्छतेला प्रारंभ केला. तत्पूर्वी देवस्थानच्या सदस्या संगीता खाडे व मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते स्वच्छतेच्या साहित्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपमाळेपासून या कामाचा प्रारंभ करण्यात आला. दिरम्यान, नवरात्रौत्सवाच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची बैठक बुधवारी (दि. 7) होण्याची शक्यता आहे. नवरात्रौत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी संजय मेंटेनन्सच्या वतीने अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. (प्रतिनिधी)निागमुद्रेवर मौनचअिंबाबाई मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेला दोन महिने झाले तरी जिल्हाधिकार्?यांनी नागमुद्रेसंबंधी मौन बाळगले आहे. याबाबत श्रीपूजकांनी संवर्धन प्रक्रिया करणार्?या तज्‍जञंना मूतीर्बाबत जी माहिती पुरवली होती त्या आधारे खुलासा देण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी दिली होती. त्यानंतर सैनी यांनी बैठक घेणो अपेक्षित होते; मात्र अद्याप ही बैठक घेण्यात आलेली नाही, उलट या विषयावर जबाबदार घटकांनी केवळ मौन पाळले आहे. स्वितंत्र पाइपलाइनचा प्रस्तावकिाही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समितीच्या पदाधिकार्?यांच्या म्हणण्यानुसार वारंवार विनंती करूनही महापालिका व्यवस्थितरीत्या पाणीपुरवठा करीत नाही. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, अंबाबाई मंदिराला पाणीपुरवठ?ासाठी प्राधान्य दिले जाते. पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही देवस्थानला स्वतंत्र पाईपलाईनच्यामिागणीचा प्रस्ताव महापालिकेला द्या, असे सांगितले होते; पण त्याचा गांभीयार्ने विचार केला गेला नाही. ‘नाग’ या विषयावर सामंजस्याने मार्ग काढावाअिंबाबाई देवीच्या मस्तकावरील नागाच्या विषयावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व श्री पूजक यांनी सामंजस्याने मार्ग काढावा. त्याचबरोबर तिरूपतीकडून अंबाबाईला येणार्?या शालूबाबत देवस्थान समितीकडून विचार होईल, असे जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Start of cleanliness of Ambabai temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.