साखरे येथे धान्य खरेदी केंद्र सुरू

By admin | Published: October 31, 2016 03:28 AM2016-10-31T03:28:02+5:302016-10-31T03:28:02+5:30

तालुक्यात ७८५८ हेक्टर क्षेत्रात भात शेती केली जाते.

Start the grain shopping center at Sugar | साखरे येथे धान्य खरेदी केंद्र सुरू

साखरे येथे धान्य खरेदी केंद्र सुरू

Next


विक्रमगड : तालुक्यात ७८५८ हेक्टर क्षेत्रात भात शेती केली जाते. या भाताची विक्री खुल्या बाजारात केली जाते. परंतु भात खरेदी करतांना खुल्या बाजारात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर विक्रमगड तालुक्यातील साखरे येथील आदिवासी
विकास महामंडळ मर्या. नासिक उपप्रादेशिक कार्यालय जव्हार
यांनी भात एकाधिकार केंद्र सुरु
केले. त्याचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते करण्यात आले.
या धान्य एकाधिकार खरेदी भात अ ग्रेड १५१० रुपये भाव देण्यात आला असून भात ब ग्रेड १४७०, नागली १४००, वरई ३०००, तूर ३५००, खुरासणी ४५००, उडीद ५००० भाव निश्चित करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ३५ केंद्रे असून आज ती सुरु झाल्याची माहिती सवरा यांनी दिली.
तालुक्यात भात कापणीला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत भात झोडणी होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला भात धान्य खरेदी केंद्रावर विकावा
या कार्यक्रमास प्रादेशिक व्यवस्थापक रविंद्र तांबोळी,
आदिवासी विकास महामंडळ संचालक देविदास पाटील, बाबाजी काठोले, चेअरमन दत्ता भडांगे, संदीप
पावडे, उपसभापती मधुकर खुताडे, पं.स. सदस्य आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Start the grain shopping center at Sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.