‘लोकमत गॅझेट एक्स्पो २०१७’ प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ
By admin | Published: March 5, 2017 03:38 PM2017-03-05T15:38:06+5:302017-03-05T15:45:22+5:30
परिपूर्ण कुटुंबाच्या गरजा डोळ्यांसमोर ठेवून अद्ययावत, ब्रॅँडेड इलेक्ट्रॉनिक विश्वातील वस्तूंनी परिपूर्ण ‘लोकमत गॅझेट एक्स्पो २०१७’ या प्रदर्शनाला शनिवारपासून दिमाखात प्रारंभ
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 5 - परिपूर्ण कुटुंबाच्या गरजा डोळ्यांसमोर ठेवून अद्ययावत, ब्रॅँडेड इलेक्ट्रॉनिक विश्वातील वस्तूंनी परिपूर्ण ‘लोकमत गॅझेट एक्स्पो २०१७’ या प्रदर्शनाला शनिवारपासून दिमाखात प्रारंभ झाला. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक एस. एस. कम्युनिकेशन अॅँड सर्व्हिसेस; तर असोसिएट प्रायोजक आदित्य पेरिफिरल्स प्रा. लि. हे आहेत.
ब्रॅँडेड लॅपटॉप, डेस्कटॉप, अद्ययावत स्मार्टफोनसह सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेटस्ची दुनिया हौशी कोल्हापूरकरांसाठी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे उद्या, सोमवारपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते झाले. यावेळी एस. एस. कम्युनिकेशन अॅँड सर्व्हिसेसचे सिद्धार्थ शहा, आदित्य पेरिफिरल्स प्रा. लि.चे अरुण माणगावे, गिरीश सेल्सचे गिरीश शहा, सुभाष फोटोजचे शंभू ओऊळकर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, श्रीराम जोशी उपस्थित होते.
शनिवार हा प्रदर्शनाचा पहिलाच दिवस असला तरी सकाळपासूनच ग्राहकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक्स विश्वातील हे अनोखे प्रदर्शन ‘घरातल्या प्रत्येकासाठी.... प्रत्येक घरासाठी’ या थीमवर आधारलेले असल्यामुळे अनेकांनी कुटुंबासह प्रदर्शन पाहण्यास उपस्थिती लावली होती. दक्षिण महाराष्ट्रात पहिल्यांदाच भरविण्यात येत असलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून गृहिणी, विद्यार्थी, नोकरदार अशा सर्वच वर्गांसाठी आवश्यक सर्वच गॅझेट्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाला भेट देणारे नागरिक प्रत्येक स्टॉलवर थांबून माहिती घेण्यात मग्न होते व अद्ययावत माहिती मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहºयावर दिसत होते. स्टॉलवरील व्यक्तीही ग्राहकांच्या शंकांना उत्तरे देत होते; यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी येऊन विविध स्टॉलवरील अद्ययावत स्मार्टफोन, लॅपटॉप्सची माहिती घेतली. अनेकांनी आपल्या आवडीच्या वस्तूंचे बुकिंगही केले.
सर्वांसाठी उपयोगी पडतील अशा गॅझेटस्च्या दुनियेचे द्वार प्रदर्शनाच्या माध्यमातून खुले झाले असून, त्यामध्ये ब्रॅँडेड कंपन्यांच्या वैयक्तिक, गृहोपयोगी, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या वस्तूंचा समावेश आहे. तरी या प्रदर्शनाला हौशी कोल्हापूरकरांनी भेट द्यावी, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.
खरेदीवर आकर्षक आॅफर्स :
प्रदर्शनातील गॅझेट्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अर्थसाहाय्य, हप्त्यांची सोय यांसह विविध सवलती व आकर्षक आॅफर्सही देण्यात येत आहेत.
जिल्हाधिका-यांनीही घेतली माहिती
प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील सीसीटीव्ही, डेस्कटॉप, स्मार्टफोन्स, प्रिंटर याबद्दल उत्सुकतेने प्रत्येक स्टॉलवर थांबून माहिती घेतली. त्यासह आपल्या प्रत्येक शंकेचे निरसन करून घेतले.
‘कॅशलेस’ची सोय
ग्राहकांच्या सोयीसाठी प्रत्येक स्टॉलवर कार्ड पेमेंट, स्वाइपची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, हे पाहून जिल्हाधिका-यांनीही कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देणाºया उपक्रमाचे कौतुक केले.
सर्वांना मोफत प्रवेश
तंत्रज्ञान विश्वातील लेटेस्ट अपडेट देणारे हे प्रदर्शन राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे उद्या, सोमवारपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.
हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी
प्रदर्शनात अद्ययावत गॅझेटस्वर आकर्षक आॅफर्ससह भव्य डिस्काउंट्स देण्यात येत असून, खरेदी करणाºया ग्राहकांना हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधीही या माध्यमातून मिळणार
प्रदर्शनातील गॅझेटस् :
* अद्ययावत स्मार्टफोन
* ब्रॅँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप, प्रिंटर्स
* सर्व कंपन्यांचे कॅमेरे
* वॉशिंग मशीन
* रेफ्रिजरेटर
* टीव्ही
* एसी
* इन्व्हर्टर
* सीसीटीव्ही
* म्युझिक सिस्टीम, होम थिएटर
* गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
प्रदर्शनातील ‘लकी ड्रॉ’चे विजेते :
प्रदर्शनाच्या निमित्ताने खरेदी करणा-या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येत आहेत. त्यामध्ये विजय तळवेकर, अमित ढेरे (मोबाईल), शरद वालावलकर (इंडक्शन कुकर), श्रद्धा पावडे (होम थिएटर) पहिल्या दिवशीचे मानकरी ठरले.