दोन आठवड्यांत मिनी फॉरेन्सिक लॅब सुरू करा

By admin | Published: March 12, 2015 05:19 AM2015-03-12T05:19:23+5:302015-03-12T05:19:23+5:30

येत्या दोन आठवड्यांत प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मिनी फॉरेन्सिक लॅब सुरू करा, असे उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला खडसावले़

Start Mini Forensic Labs in two weeks | दोन आठवड्यांत मिनी फॉरेन्सिक लॅब सुरू करा

दोन आठवड्यांत मिनी फॉरेन्सिक लॅब सुरू करा

Next

मुंबई: येत्या दोन आठवड्यांत प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मिनी फॉरेन्सिक लॅब सुरू करा, असे उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला खडसावले़
एकूण ३५ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यांमध्ये फॉरेंसिक लॅब नसल्याचे वृत्त वर्तमानपत्रातून आले होते. त्या वृत्ताची दखल घेत न्यायालयाने हा मुद्दा सुओमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतला़ तसेच प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात याची मिनी लॅब सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने गेल्यावर्षी दिले होते़ या लॅबची रिक्त पदे भरण्याचे व ४५ मोबाईल व्हॅन लॅब घेण्याचे
निर्देशही न्यायालयाने शासनाला दिले होते़
मात्र या आदेशाची अंमलबावणी झाली नसल्याचे न्या़ नरेश पाटील व न्या़ अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर स्पष्ट झाले़ याची अंमलबजावणी न झाल्याने मुंबईसह इतर जिल्ह्यातील लॅबवर ताण येत आहे़ या सर्व लॅबमध्ये सध्या अकरा हजार नमुने चाचणीच्या प्रतिक्षेत असल्याचेही अ‍ॅमक्यस क्युरी सारंग कोतवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने वरील आदेश दिले़
गेल्यावर्षी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास गुन्ह्याचा तपास जलदगतीने होऊ शकेल़ मोबाईल लॅब तत्काळ घटनास्थळी पोहोचून आवश्यक ते नमुने घेऊन तपास वेगाने होऊ शकेल, असे मतही न्यायालयाने या वेळी व्यक्त
केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Start Mini Forensic Labs in two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.