जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील बौद्ध मूर्तीवरील किरणोत्सवास प्रारंभ

By Admin | Published: March 14, 2017 07:02 PM2017-03-14T19:02:36+5:302017-03-14T22:29:27+5:30

स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत एकूण 34 लेण्या असून यामध्ये बारा बौद्ध लेण्या आहेत.

Start of radiation on Buddhist idols of the famous Vayral caves | जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील बौद्ध मूर्तीवरील किरणोत्सवास प्रारंभ

जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील बौद्ध मूर्तीवरील किरणोत्सवास प्रारंभ

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
वेरुळ, दि.14 - स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत एकूण 34 लेण्या असून यामध्ये बारा बौद्ध लेण्या आहेत. यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेण्या ह्या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीमधील मूर्तिवर सूर्य उत्तरायानला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. 
ही सूर्यकिरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येण्यास बुधवार पासून सुरुवात झाली असून येत्या आठ दिवस हा सोहळा भाविकांसह पर्यटकांना अनुभवता येईल अशाच प्रकारची सूर्यकिरणे हे मागच्या वर्षी 10 मार्च रोजी आली होती. तर महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यामधील हा शेवटचा चैत्य असून महायानास समर्पित आहे. यामध्ये वज्रयाणाची काही शिल्पे बघायला मिळतात यालाच सुतार की झोपडी किंवा विश्वकर्मा मंदिर म्हणतात तर गुजरात मधील विश्वकर्मा लोक बुद्धालाच विश्वकर्मा समजून नमन करतात याचा उल्लेख त्यांच्या धार्मिक ग्रंथात आहे. गुहेत प्रवेश केल्याबरोबर समोरच भगवान बुद्ध बौधी (पिंपळाचे) वृक्षाखाली बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपानी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपानी पहावयास मिळतात.  मागच्या बाजूस स्तूप आहे तर छतास गज पुष्टाकृती आकार दिलेला दिसून येतो तर समोरच वाद्य मंडप दिलेला आहे.

Web Title: Start of radiation on Buddhist idols of the famous Vayral caves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.