भिराच्या तापमानाचा अभ्यास सुरू

By Admin | Published: April 1, 2017 03:34 AM2017-04-01T03:34:25+5:302017-04-01T03:34:25+5:30

मंगळवारी देशातील सर्वाधिक कमाल ४६.५अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेल्या माणगाव तालुक्यातील भिरा येथे

Start the study of the temperature of the vibration | भिराच्या तापमानाचा अभ्यास सुरू

भिराच्या तापमानाचा अभ्यास सुरू

googlenewsNext

अलिबाग : मंगळवारी देशातील सर्वाधिक कमाल ४६.५अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेल्या माणगाव तालुक्यातील भिरा येथे भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ मेट्रॉलाजिस्ट हेमंत कारेकर शुक्रवारी दाखल झाले. भिरा येथील तापमापकाजवळच त्यांनी आणलेले हवामान विभागाचे तापमापक बसवण्यात आले आहे. शुक्रवारी या दोन्ही तापमापकांवरील तापमानाच्या नोंदी घेण्यात आल्या.
शनिवारीही अशाच प्रकारे दोन्ही तापमापकांवरील तापमान नोंदी घेण्यात येणार आहेत. गरज भासल्यास आणखीही काही दिवस अशा दोन्ही तापमापकांच्या तापमान नोंदी घेऊन तुलनात्मक निरीक्षणाअंती निष्कर्ष अहवाल सादर होईल, अशी माहिती त्यांच्यासोबत उपस्थित रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)

सदोष यंत्रणेचा फटका
औरंगाबाद : सदोष यंत्रणेमुळे रायगड जिल्ह्यातील भीरा येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची शंका हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी उपस्थित केली. भीती घालून कोणाचे हित साध्य केले जात आहे? त्यातून केवळ एसी-कूलरची विक्री वाढणार आहे. दुसरे काही नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Start the study of the temperature of the vibration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.