1 जानेवारीपासून बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात - नितिन गडकरी
By Admin | Published: September 13, 2016 02:32 PM2016-09-13T14:32:34+5:302016-09-13T17:02:42+5:30
1 जानेवारीपासून 40 हजार कोटींच्या बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना दिली आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - 1 जानेवारीपासून 40 हजार कोटींच्या बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात होईल. मुंबई - गोवा हायवे प्राथमिकता असून 2018 च्या आधी चार लेन सुरु करण्यात येतील. चार महिन्यांमध्ये 10 हजार कोटींच्या कामांचे आदेश जारी करण्यात येतील. तसंच 10 हजार कोटी खर्च करुन पंढरपूर वारीच्या रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना दिली आहे.
लोकांचं आयुष्य ही आमची प्राथमिकता आहे. महामार्गावर अपघाताची ठिकाणं शोधून त्याठिकाणी क्रॅश बॅरिअर सोलार लाईटचा वापर करुन स्पीड ब्रेकर्स तयार करण्यात येतील, यामुळे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी होईल असा विश्वास नितिन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
.@nitin_gadkari shares the goverments plans for the Pallkhi Marg! #LokmatInfraConclavepic.twitter.com/PvfTjFvFIW
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 13, 2016
आपण पैसे किंवा इतर गोष्टींमध्ये कमी पडत नाही आहोत. मात्र आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. सर्व प्रक्रिया कायेदशीर झाल्या पाहिजेत असा आदेश देण्यात आला आहे. टॉयलेट पेपरसाठीही आम्ही टेंडर काढत आहोत मात्र त्याचवेळी वेळेची मर्यादाही पाळत आहोत प्रलंबित राहणं टाळा हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील महत्वाकांक्षी प्रकल्पांना लवकरात लवकर पुर्ण करण्यात आग्रही आहेत असं नितिन गडकरी बोलले आहेत.
"#Mumbai & #Maharashtra are the growth engines of nation. I'm the ambassador of Maharashtra in Delhi" @nitin_gadkaripic.twitter.com/ljeR6gW5RS
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 13, 2016
पर्यावरणाबद्दल पुर्णपणे जागरुक असून एकही झाड कापायला न लागावं यासाठी प्रयत्न करत आहोत. ग्रीन हायवे तयार करण्यात येणार असून यामुळे प्रदूषण कमी होईल. गुजरातमध्ये एअरपोर्टप्रमाणे बसपोर्ट उभारण्यात येणार आहेत. बसपोर्ट उभे करण्यासाठी राज्यांनी आम्हाला जास्तीत जास्त जमीन देणं गरजेचं आहे कारण आम्हाला त्याची गरज आहे. महाराष्ट्रामधील रस्त्यांचं जाळं 2.5 ते 3 लाख किमीपर्यंत पसरवण्यात येईल असंही नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे.
"The cement industry is no less than a mafia" @nitin_gadkari on difficulties faced by during projects. pic.twitter.com/6ilmuQQAgy
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 13, 2016
बंदरांची हाताळणी करण्यामध्ये गुजरातमधील अदानीपेक्षा महाराष्ट्राची कार्यक्षमता जास्त आहे. पनवेल ते जेएनपीटीसाठी 8 लेन बनवण्याचा प्रस्ताव आहे. जलमार्ग, रेल्वे आणि त्यानंतर रस्ते हा आमच्या प्राथमिकतेचा क्रम असल्याचं नितीन गडकरींनी यानिमित्ताने स्पष्ट केलं.
मालदिवमध्ये 47 समुद्र जहाज वाहतुकीचे रस्ते असताना आपल्याकडे एकही नाही. आपल्याकडे 13 हजार बेटे आहेत ज्यांचा अजिबात वापर होत नाही. जलवाहतूकीसाठी 20 हजार किमी जलमार्ग आणि 7.5 हजार किमी समुद्रकिनारा असताना आपण काहीतरी करण्यापेक्षा फक्त चर्चात करतो अशी खंत गडकरींनी बोलून दाखवली. माल मुंबईहून लंडनला पाठवणं हे मुंबईहून दिल्लीला पाठवण्यापेक्षा जास्त सोपं आहे. हे बदलण्याची गरज असल्याचं मत गडकरींनी व्यक्त केलं.
कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मनमाड ते इंदोर मुख्य रेल्वे मालवाहतूकमार्ग असेल. सोबतच आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या स्वस्त कार भारतात तयार केल्या जातील अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.
"The government's 1st priority is Waterways, 2nd is Railways & 3rd is Roadways" @nitin_gadkari#LokmatInfraConclavepic.twitter.com/ecpYpycgsf
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 13, 2016
काही पर्यावरणवादी सतत विकासाच्या कामांना विरोध करत असतात. वांद्रे - वरळी सी लिंकचं बांधकाम सुरु असताना हा अनुभव आला. फक्त 7 लोकांनी एकूण 125 याचिका दाखल केल्या होत्या असं नितिन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. मुंबईतील समुद्रकिना-यांवर घाण वास येत असतो. कचरा समुद्रकिना-यात टाकण्यापासून आपण रोखू शकत नाही का ? कच-यासोबत प्लास्टिकचाही निचरा केला जाऊ शकतो. आणण तो करणे गरजेचे आहे असं आवाहन नितिन गडकरी यांनी यावेळी केलं.
विकासाचा सर्वात जास्त फायदा कृषी उद्योगाला होईल. मुंबई आणि महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. दोघेही देशाच्या विकासाची इंजिन आहे. मी दिल्लीत बसलेलो महाराष्ट्राचा अॅम्बेसिडर आहे असं नितिन गडकरी बोलले आहेत.