सोमवारनंतर कारखाने सुरू ?
By Admin | Published: August 20, 2015 12:27 AM2015-08-20T00:27:29+5:302015-08-20T00:27:29+5:30
यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित वेतनाबाबत मुंबई उच्च न्यायालयात असलेली सुनावणी २४ आॅगस्टला असून, त्यानंतरच सायझिंग कारखाने सुरू करण्याबाबत विचार केला जाईल
इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित वेतनाबाबत मुंबई उच्च न्यायालयात असलेली सुनावणी २४ आॅगस्टला असून, त्यानंतरच सायझिंग कारखाने सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, अशा आशयाचा निर्णय सायझिंगधारक कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सायझिंग कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या संपाबाबत कारखाना पातळीवर चर्चा करून अंतरिम वेतनवाढ घेऊन कारखाने सुरू करण्यात येतील, अशी घोषणा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने केली. त्याबाबत विचारविनिमयासाठी मंगळवारी सायझिंगधारक कृती समितीची एक बैठक रोटरी क्लबच्या सभागृहात झाली. किमान वेतनाबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर २४ आॅगस्ट रोजी होणारी सुनावणी व त्यावरील निर्णय विचारात घेऊ. (प्रतिनिधी) यंत्रमाग कामगारांच्या २२ आॅगस्ट रोजीच्या सभेमध्ये होणाऱ्या आंदोलनाची सूचना मिळेल. सायझिंग-वार्पिंग कामगारांनी दाखल केलेले क्लेम अँप्लिकेशनचे दावे कामगारांनी मागे घ्यावेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये वेतनवाढ दिली जाणार नाही, या मुद्द?ावर सायझिंग कारखानदार ठाम असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.
निर्णयाचा विचार
कोल्हापूर येथील औद्योगिक न्यायालयात सध्याच्या संपाच्या वैधतेबाबत होणारा निकालही विचारात घेतला पाहिजे, अशी भूमिका काही कारखानदारांनी स्पष्ट केली आणि अखेर उपरोक्त निर्णय घेऊन बैठक संपविण्यात आली.