१४ जूनपासून आॅनलाइन पदवी प्रवेशाला सुरुवात

By Admin | Published: June 13, 2016 03:02 AM2016-06-13T03:02:03+5:302016-06-13T03:02:03+5:30

पदवीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला १४ जूनपासून सुरुवात होणार आहे.

Starting of online degree from June 14 | १४ जूनपासून आॅनलाइन पदवी प्रवेशाला सुरुवात

१४ जूनपासून आॅनलाइन पदवी प्रवेशाला सुरुवात

googlenewsNext


नवी मुंबई : करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदवीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला १४ जूनपासून सुरुवात होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी सक्तीची असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून विद्यापीठाने कला, वाणिज्य आणि विज्ञान (अनुदानित आणि विनाअनुदानित ) या विद्याशाखांतील अभ्यासक्र मांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे तिन्ही विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. या प्रवेश प्रक्रि येसंबंधीची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर १२ जून रोजी उपलब्ध करु न देण्यात येणार आहे.
कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, कोणती शाखा निवडावी याची चर्चा आजूबाजूला पहायला मिळत असून सीईटीमध्ये समाधानकारक गुण न मिळालेले विद्यार्थीदेखील पदवीसाठी प्रवेश घेणार आहेत. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेकडे यंदा विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. नीटच्या घोळामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या गोंधळामुळे मेडिकलकडे वळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनीही पदवी अभ्यासक्रमाची निवड केल्याचे चित्र पहायला मिळते. बारावीचा निकाल पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची कटआॅफ काही टक्क्यांनी घसरणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार यंदा छायांकित प्रती आणि गुणपडताळणीकडेही विद्यार्थ्यांचा कल दिसून येत असून पुनर्मूल्यांकनासाठीही मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. एक-एक गुणांसाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची स्पर्धा पहायला मिळते. गुणवत्ता यादीनंतर लगेचच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पदवी महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.
>आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक
अर्ज विक्र ी :
२६ मे ते १४ जून
प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी
प्रक्रि या : १४ जून ते २१ जून
इन हाऊस अ‍ॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश : ७ ते २१ जून
फॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख : १८ ते २१ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी : २२ जून (सायंकाळी ६ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा : २३ व २४ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)
दुसरी गुणवत्ता यादी : २४ जून (सायंकाळी ६ वा.)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा : २५ व २६ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)
तिसरी गुणवत्ता यादी : २६ जून (सायंकाळी ६ वा.)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा : २७ व २८ जून (दुपारी ३)

Web Title: Starting of online degree from June 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.