स्टार्टअप, इंडिया
By admin | Published: October 29, 2016 03:13 AM2016-10-29T03:13:19+5:302016-10-29T03:13:19+5:30
माणसाची गुणवत्ता त्याच्या स्थानावरून मोजण्याची ‘खास भारतीय’ प्रथा मोडीत काढल्याबद्द्ल या देशाने स्टार्टअप कंपन्यांचे आभार मानले पाहिजेत.
माणसाची गुणवत्ता त्याच्या स्थानावरून मोजण्याची
‘खास भारतीय’ प्रथा मोडीत काढल्याबद्द्ल या देशाने
स्टार्टअप कंपन्यांचे आभार मानले पाहिजेत.
विदेशातल्या शिक्षणाचा-कामाचा अनुभव घेऊन
स्वतंत्र व्यवसाय उभारण्यासाठी भारतात परतलेल्या
तरुण उद्योजकांच्या पिढीने इथली ‘कार्यसंस्कृती’ बदलायला घेतली आहे.
इथे बॉसला वेगळी केबीन नसते, अनेकदा तर बॉसच नसतो.
असतात ते एका ध्येयाने झपाटलेले सहकारी.
रतन टाटा
ते एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारतात.
एका समान पातळीवरून गुणवत्तेच्या आधारावर परस्परांशी स्पर्धा करतात.
इथे व्यावसायिक यश मिळवण्यासाठी कुणातरी बड्या घरचे बेटे असण्याची सक्ती नसते,
सत्ताकेंद्रांशी ‘अर्थपूर्ण जवळीक’ आणि ‘कनेक्शन्स’ असण्याची पूर्वअट नसते.
- बदलत्या भारताच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असे
उद्योगक्षेत्रातले हे तरुण चित्र मला मोठी उमेद देते.
माझी पिढी हे घडवू शकली नाही...
आता या पंचविशीतल्या तरुण मुला-मुलींचा हात धरून मी शिकतो आहे.
-------