राज्यात १०८ कॉपी प्रकरणे उघडकीस

By admin | Published: March 2, 2016 03:12 AM2016-03-02T03:12:34+5:302016-03-02T03:12:34+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी भाषा विषयाच्या पेपरला राज्यातील

In the state, 108 copies of cases are exposed | राज्यात १०८ कॉपी प्रकरणे उघडकीस

राज्यात १०८ कॉपी प्रकरणे उघडकीस

Next

पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी भाषा विषयाच्या पेपरला राज्यातील तब्बल १०८ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले.
यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक ६२ विद्यार्थ्यांवर करवाई करण्यात आली, तर पुणे विभागात ५, नागपुरात २, मुंबईत १, कोल्हापुरात ३, अमरावती २ , नाशिक ३० आणि लातूर येथील ३ विद्यार्थ्यांवर परीक्षेत गैरप्रकार केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
खान्देशात १० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात जळगाव जिल्ह्यातील नऊ आणि धुळे जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the state, 108 copies of cases are exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.