राज्यात ११ लाख रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांची संख्या १४ लाखांहून अधिक, आतापर्यंत ३७ हजार मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 08:57 PM2020-10-01T20:57:06+5:302020-10-01T20:57:26+5:30
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.८४ टक्के झाले असून मृत्यूदर २.६५ टक्के इतका आहे.
मुंबई – राज्यात गुरुवारी १६ हजार ४७६ रुग्ण आणि ३९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात १४ लाख ९२२ कोरोनाबाधित असून मृतांची संख्या ३७ हजार ५६ इतकी झाली आहे. दिवसभरात १६ हजार १०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ११ लाख ४ हजार ४२६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.८४ टक्के झाले असून मृत्यूदर २.६५ टक्के इतका आहे.
राज्यात नोंद झालेल्या ३९४ मृत्यूंमध्ये मुंबई ४३, ठाणे २, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा २, भिवंडी निजामपूर मनपा २, मीरा भाईंदर मनपा ६, पालघर १०, वसई विरार मनपा ५, रायगड १४, पनवेल मनपा ३, नाशिक ४, नाशिक मनपा २, अहमदनगर ९, अहमदनगर मनपा ३, धुळे २, जळगाव १२, जळगाव मनपा २, पुणे १०, पुणे मनपा २५, पिंपरी चिंचवड मनपा १०, सोलापूर ६, सोलापूर मनपा १, सातारा ३५, कोल्हापूर १०, कोल्हापूर २, सांगली १३, सांगली मिरज कुपवडा मनपा ६, सिंधुदुर्ग ११, रत्नागिरी २, औरंगाबाद ५, औरंगाबाद मनपा ५, लातूर ७, उस्मानाबाद १०, बीड ४, नांदेड २, नांदेड मनपा ५, अकोला २, अमरावती ३, अमरावती मनपा ३, यवतमाळ ७, बुलढाणा १, नागपूर २४, नागपूर मनपा ३६, वर्धा ५, चंद्रपूर २ आणि अन्य राज्य/देशातील ३ रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६८ लाख ७५ हजार ४५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०.३८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ७४ हजार ६५१ व्यक्ती घरगुती अलगीकऱणात असून २८ हजार ७२० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.