राज्यात १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ३0 उपकेंद्रांना मंजुरी चार नवीन ग्रामीण रुग्णालयांचाही समावेश

By admin | Published: June 12, 2014 12:23 AM2014-06-12T00:23:23+5:302014-06-12T19:08:11+5:30

२00१ च्या लोकसंख्येच्या आधारावर आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने बृहत आराखडा तयार केला आहे.

In the state, 30 new rural hospitals including 19 Primary Health Centers are sanctioned | राज्यात १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ३0 उपकेंद्रांना मंजुरी चार नवीन ग्रामीण रुग्णालयांचाही समावेश

राज्यात १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ३0 उपकेंद्रांना मंजुरी चार नवीन ग्रामीण रुग्णालयांचाही समावेश

Next

अकोला : राज्यात २00१ च्या लोकसंख्येच्या आधारावर आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने बृहत आराखडा तयार केला आहे. त्यानुसार राज्यातील ५६ रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढविणे आणि १,२५२ नवीन आरोग्य संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्यानुसार चार ग्रामीण रुग्णालयांसह १९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३0 उपकेंद्रांना मंजुरी देण्याचा निर्णय सोमवारी राज्य शासनाने घेतला.
शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार विदर्भातील अमरावती जिल्‘ात कांडली, गडचिरोली जिल्‘ात बुरगी कादोडी, लखमापूर बोरी, कोठी, गोंदिया जिल्‘ात चिखली, चंद्रपूर जिल्‘ात बीबी, भंगाराम तळोधी, विरूर स्टेशन आणि यवतमाळ जिल्‘ात बोधेगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय अहमदनगर जिल्‘ात सात्रळ, कौठे, कमळेश्वर, पेमगिरी, कोल्हापूर जिल्ह्यात पाचगाव, बीड जिल्‘ात दिंद्रुड, रत्नागिरी जिल्‘ात तुरंबव, सांगली जि‘ात देवराष्ट्र, वांगी आणि वाटेगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या आधारावर प्राथमिक आयोग्य केंद्रांच्या हद्दीत ३0 नवीन उपकेंद्रे सुरू केली जात आहे. यात १0 विदर्भातील गोंदिया, यवतमाळ जिल्‘ात सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्‘ात घुग्गुस येथे नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. नाशिकमध्ये दळवट, पुणेमध्ये उरळीकांचन आणि सांगली जिल्‘ात हातनूर येथे नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू होईल. गडचिरोली जिल्‘ातील धानोरा येथील रुग्णालयातील खाटांची संख्या ३0 वरून ५0 करण्यात आली आहे. ठाणे जिल्‘ात वसई येथे १00 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. नागपूर जिल्‘ातील डागा स्मृती स्त्री रुग्णालयातील खाटांची संख्या ३00 वरून ५00 पर्यंत वाढविण्यास मान्यता मिळाली. 

Web Title: In the state, 30 new rural hospitals including 19 Primary Health Centers are sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.