अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!

By Admin | Published: December 26, 2015 02:39 AM2015-12-26T02:39:42+5:302015-12-26T02:39:42+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्या उद्घाटन.

State Agricultural Agriculture Exhibit in Akola! | अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!

अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!

googlenewsNext

अकोला : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अँग्रोटेक-२0१५ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २७ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, कृषिमंत्री एकनाथ खडसे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.
उद्घाटन कार्यक्रमाला अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, महाराष्ट्र कृषी व शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्यासह आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, बळीराम सिरस्कार, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, आमदार तथा कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य गोपीकिशन बाजोरिया, अमरीश पटेल, संजय रायमुलकर, अमित झनक, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, महापौर उज्ज्वला देशमुख, कार्यकारी परिषदेचे सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, नितीन हिवसे, डॉ. जयंत देसाई, गोपी ठाकरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामदास मालवे, तसेच जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत होत असलेल्या या कृषी प्रदर्शनाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ३00 च्यावर गाळे उभारण्यात आले असून, यात विविध कृषी तंत्रज्ञान, नव्या संशोधनांची माहिती शेतकर्‍यांसाठी ठेवण्यात येत आहे. अलीकडच्या काही वर्षात पावसाची अनियमितता वाढली आहे. या पृष्ठभूमीवर पाण्याची बचत आणि संबंधित तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज असल्याने याकडे या प्रदर्शनात लक्ष देण्यात आले आहे. ३0 स्टॉल यामध्ये शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत. डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या मार्गदर्शनात प्रदर्शनाची तयारी पूर्ण होत आली आहे.

Web Title: State Agricultural Agriculture Exhibit in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.