राज्यातही पूर्व प्राथमिकसाठी ऑनलाइन क्लासना अनुमती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 03:47 AM2020-07-15T03:47:15+5:302020-07-15T03:47:30+5:30
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर राज्याची भूूमिका काय असे विचारले असता वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, आमच्या विभागाची आधीची मार्गदर्शक सूचना रद्द करून नवीन काढली जाईल.
मुंबई : पूर्वप्राथमिक (प्रीप्रायमरी) वर्गांमधील चिमुकल्यांसाठी आॅनलाइन क्लास चालविण्यास अनुमती देण्याची भूमिका आता शालेय शिक्षण विभागाने घेतली असल्याचचे या विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी लोकमतला सांगितले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रीप्रायमरीच्या आॅनलाइन शिक्षणासाठी मार्गदर्शक सूचना मंगळवारी जारी केल्या असल्या तरी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने गेल्या महिन्यात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रीप्रायमरीसाठी आॅनलाइन वर्ग घेता येणार नाहीत, असे म्हटले होते.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर राज्याची भूूमिका काय असे विचारले असता वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, आमच्या विभागाची आधीची मार्गदर्शक सूचना रद्द करून नवीन काढली जाईल. त्यानुसार अर्धा तासापर्यंत आॅनलाइन वर्ग घेण्यास अनुमती दिली जाईल. त्यातील १५ मिनिटे विद्यार्थ्यांसाठी तर १५ मिनिटे ही पालकांसाठी असतील.