'चिपी विमानतळासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयानं काम करतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 04:41 PM2021-09-08T16:41:51+5:302021-09-08T16:49:46+5:30

Chipi Airport: नारायण राणेंनी काल पत्रकार परिषद घेत उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गरज नसल्याचं म्हटलं होतं.

'State and central government will work in coordination', CM's reaction on Chipi Airport | 'चिपी विमानतळासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयानं काम करतील'

'चिपी विमानतळासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयानं काम करतील'

Next

नागपूर: सिंधुदूर्गात झालेल्या चिपी विमानतळ उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत 9 ऑक्टोबरला नारी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमानतळ उद्घाटन होईल, असं जाहीर केलं. तसेच, कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गरज नसल्याचं म्हणालेत. यावर आता विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

नागपूरमध्ये मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'नारायण राणेंचा चीपी विमानतळाच्या निर्माण कार्यात मोठा वाटा आहे. मी मुख्यमंत्री असताना ते काम पूर्ण झालं, त्याचं एक उद्घाटन आम्ही केलं आहे. आता याच विमानतळावरुन विमान उडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीत हा वाद न करता, कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

समन्वयान काम करायचं
फडणवीस पुढे म्हणाले, हे विमानतळ कोकणासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मी नारायण राणे आणि आमचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. शेवटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं समन्वयानंच काम करायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की श्रेयवादाची काही लढाई नाही. राणेंचं जे काही योगदान आहे ते कुणीही नाकारु शकत नाही', असं फडणवीस यांनी म्हटलं.

काय म्हणाले होते नारायण राणे ?
नारायण राणे यांनी काल मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर 'मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्रालयाचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही', असं राणे म्हणाले. तसेच, येत्या 9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 

Web Title: 'State and central government will work in coordination', CM's reaction on Chipi Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.