कोकण रेल्वे पुरवणार अत्याधुनिक सुविधा

By admin | Published: November 4, 2015 02:55 AM2015-11-04T02:55:37+5:302015-11-04T02:55:37+5:30

मुंबई व मंगळूर या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा कोकण रेल्वे मार्ग आता केवळ कोकणवासीयांपुरताच मर्यादित न राहता लवकरच कोल्हापूर, सातारा या नवीन रेल्वे मार्गाला सुरुवात

The state-of-the-art facility to provide the Konkan Railway | कोकण रेल्वे पुरवणार अत्याधुनिक सुविधा

कोकण रेल्वे पुरवणार अत्याधुनिक सुविधा

Next

नवी मुंबई : मुंबई व मंगळूर या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा कोकण रेल्वे मार्ग आता केवळ कोकणवासीयांपुरताच मर्यादित न राहता लवकरच कोल्हापूर, सातारा या नवीन रेल्वे मार्गाला सुरुवात होणार आहे. यशस्वी वाटचाल करणाऱ्या या कोकण रेल्वेला २०१५-१६ साली ३९ कोटी ३९ लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. तर अपघात टाळण्यासाठी १६हजारांपेक्षा अधिक ठिकाणांचे फेल्युअर काढण्यात आले आहेत. मंगळवारी बेलापूर भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कोकण रेल्वेच्या वर्षभराच्या यशस्वी वाटचालीबद्दल माहिती देताना अत्याधुनिक तसेच उत्तम दर्जाच्या सेवा पुरवून कोकण रेल्वे मार्गाचा आणखी विकास करणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानू तायल यांनी दिली.
कोकण रेल्वे प्रशासनाने २०१४-१५ या आर्थिक वर्षात ९७२ कोटी ६१ लाख रु पयांची उलाढाल केली. मागील वर्षी ही उलाढाल ९३२ कोटी ९५लाख इतकी होती. गतवर्षी रेल्वेला मिळणाऱ्या नफ्यामध्ये २४ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर या वर्षी आतापर्यंत १५ कोटी ८७ लाख रु पयांचा निव्वळ नफा मिळवला असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानू तायल यांनी दिली. पत्रकार परिषदेला कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सिध्देश्वर तेलुगू, संजय गुप्ता (निर्देशक, परिवहन तसेच वाणिज्य), अमिताभ बॅनर्जी (निर्देशक, अर्थ) राजेंद्र कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

विद्युतीकरणासाठी
७५० कोटी खर्च
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी तब्बल ७५० कोटींचा खर्च येणार आहे. कोकण रेल्वेच्या एकेरी मार्ग उभारणीसाठी ३ हजार ५०० कोटींचा खर्च आला होता. आता दुपदरीकरणासाठी १० हजार कोटींचा खर्च येणार आहे.कोकण रेल्वेने रोहा ते पेणपर्यंत दुपदरीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. रोहा ते ठोसूर या ७४१ किमी मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे.

नवीन रेल्वे स्थानके उभारणार
तिकिटासाठी विशेष सुविधा, अत्याधुनिक सेवा-सुविधांयुक्त रेल्वे स्थानक, बायो टॉयलेट, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून दोन वर्षात १०० कोटीपेक्षा जास्त खर्च कोकण रेल्वे करणार आहे. पॅसेंजर रेल्वेच्या संख्येत वाढ केली जाणार असून प्रवाशांची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. दुपदरीकरणामुळे रेल्वे स्थानकांची संख्या वाढविली जाणार असून १५ ते २० नवीन रेल्वे स्थानके उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.

कोकण रेल्वेच्या कामगिरीचा आढावा
-३२४० कोचमध्ये १०५०० बायो-टॉयलेट
-१०.५मेगा वॉल्ट पवनचक्की कार्यरत असून २५मेगा वॉल्ट पवनचक्की येता नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत कार्यान्वित करणार
-रेल्वेस्थानकावर वाय-फाय सुविधा पुरविणार (अहमदाबाद राजधानी आणि चंदिगड शताब्दी एकूण सहा लोकलला मंजुरी)
-भारतभर २४/७ हेल्पलाइन क्रमांक १३८, सुरक्षेसाठी १८२
-आॅनलाइन नोंदणी तसेच तिकीट बुकिंग
-रद्द झालेल्या ट्रेनची माहिती देण्याकरिता एसएमएस सुविधा
-ई-तिकिटाची अत्याधुनिक सेवा हिंदी भाषेतही उपलब्ध, अंधांसाठीही विशेष ई-तिकिटाची सुविधा
-शेतकऱ्यांसाठी ‘किसान यात्रा’ विशेष ट्रेन
-महिला डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा

Web Title: The state-of-the-art facility to provide the Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.