ऑर्थोपेडिक इम्प्लांट’ च्या अवैध कारखान्यांची राज्यभर शोधमोहीम
By admin | Published: February 17, 2017 02:54 AM2017-02-17T02:54:34+5:302017-02-17T02:54:34+5:30
अन्न व औषध प्रशासनाची मोहीम; मोठय़ा शहरांवर लक्ष
सचिन राऊत
अकोला, दि. १६- मानवी शरीरातील दोन तुटलेले हाड जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या 'ऑर्थोपेडिक इम्प्लांट'ची निर्मिती करणार्या अवैध कारखान्यांच्या शोधासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभर शोधमोहीम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. राज्यातील मोठय़ा शहरातील अशा कारखान्यांवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.
'ऑर्थोपेडिक इम्प्लांट'ची निर्मिती करणारे कारखाने तसेच या साहित्याची खरेदी-विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना बंधनकारक असतानाही विना परवाना असलेल्या कारखान्यातून ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची निर्मिती करण्यात येत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. त्यामुळे खळबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची निर्मिती करणार्या कारखान्यांच्या तपासणीसाठी राज्यभर शोधमोहीम हाती घेतली आहे. या शोधमोहिमेत ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची विना परवाना उत्पादन करणार्या कारखान्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यानंतर सदर कारखाने ह्यसीलह्ण करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. भिवंडी, डोंबीवली, वसई, नवी मुंबई, नांदेड, ठाणे, अकोला या ठिकाणच्या ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णचे उत्पादन करणार्या कारखान्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यातील भिवंडी, डोंबिवली, वसई, नवी मुंबईत आणि परराज्यातील गुजरातमधील ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची निर्मिती करणार्या कारखान्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना नसल्याचेही काही प्रकार आता उघड झाले आहेत. ही शोध मोहीम उर्वरित शहरांमध्येही राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
'ऑर्थोपेडिक इम्प्लांट'चे उत्पादन करणार्या कारखान्यांचा शोध अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घेण्यात येत आहे.
विना परवाना चालविण्यात येत असलेल्या कारखान्यांची तपासणी करून त्यांचे परवाने तपासण्यात येत आहेत. मोठय़ा शहरांमध्ये ही तपासणी करण्यात येत असून, राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात ही तपासणी होणार असून, अवैध कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
हर्षदीप कांबळे
आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य.
अवैध कारखान्यांवर होणार जप्तीची कारवाई
राज्यात ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची अवैधरीत्या निर्मिती करणार्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई होणार आहे. राज्यातील सर्वच कारखान्यांचे परवाने आता तपासण्यात येणार आहेत. बहुतांश कारखान्यांनी वैद्यकीय मापदंड पूर्ण केलेला नसतानाही ह्यऑर्थोपेडिक इम्प्लांटह्णची निर्मिती सुरूकेल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.