‘...तर राज्य बँकेकडून कर्जपुरवठा’

By admin | Published: April 7, 2017 06:11 AM2017-04-07T06:11:49+5:302017-04-07T06:11:49+5:30

जिल्हा मध्यवर्ती बँक कमकुवत असल्यास राज्य सहकारी बँकेकडून शेतक-यांना कर्ज देण्याचा राज्य शासन प्रयत्न करेल.

'... State Bank of India lending' | ‘...तर राज्य बँकेकडून कर्जपुरवठा’

‘...तर राज्य बँकेकडून कर्जपुरवठा’

Next


मुंबई : जिल्हा मध्यवर्ती बँक कमकुवत असल्यास राज्य सहकारी बँकेकडून शेतक-यांना कर्ज देण्याचा राज्य शासन प्रयत्न करेल. शेतक-यांच्या जमिनींचा लिलाव करण्यात येणार नाही, शेतक-यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
२९ जिल्ह्यांतील महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँका अवसायनात काढण्यात आल्या. त्यासंदर्भात आमदार चंद्रदीप नरके यांनी लक्षवेधी मांडली होती. शेतक-यांच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ दिल्याने ९४६.५४ कोटी ऐवजी ७१३ कोटींची शासन सवलत देणार आहे. शिवाय, कोणत्याही शेतक-याच्या जमिनीचा लिलाव करण्यात येणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: '... State Bank of India lending'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.