लातुरात शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक
By admin | Published: March 3, 2016 04:48 AM2016-03-03T04:48:45+5:302016-03-03T04:48:45+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २९ मंत्री शुक्रवारी लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील २९ तालुक्यांची दुष्काळ पाहणी करणार आहेत.
लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २९ मंत्री शुक्रवारी लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील २९ तालुक्यांची दुष्काळ पाहणी करणार आहेत. ‘एक दिवस, एक मंत्री, एक तालुका’ अशा पद्धतीने पाहणीचे नियोजन असून त्याच दिवशी सायंकाळी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
लातूर जिल्ह्यातील १०, उस्मानाबाच्या ८ आणि बीडच्या ११ अशा २९ तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. या प्रत्येक तालुक्यात २९ मंत्र्यांकडून पाहणी होईल. यात भाजपाचे २० आणि शिवसेनेच्या नऊ मंत्री असतील. निलंगा तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरमध्ये आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, बीड तालुक्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गेवराईत महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, धारुर येथे अन्न व सुरक्षामंत्री गिरीष बापट, उस्मानाबाद तालुक्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे, परांडा औद्यौगिक विकासमंत्री सुभाष देसाई, कळंब सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, उमरगा परिवहनमंत्री दिवाकर रावते पाहणी करतील. (प्रतिनिधी)