राज्यात मंगळवारी 52.68 टक्के काेराेना लसीकरण पूर्ण; १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ; सर्वाधिक लसीकरण मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 01:21 AM2021-01-20T01:21:48+5:302021-01-20T07:08:59+5:30

राज्यात सर्वाधिक लसीकरण पुन्हा मुंबईत झाले असून १ हजार ५९७ लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्याखालोखाल ठाण्यात १ हजार ४३४ तर पुण्यात १ हजार ४०३ लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. दिवसभरात हिंगोलीत सर्वांत कमी १२० लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे.

The state completed 52.68 per cent Corona vaccination on Tuesday; Most vaccinations in Mumbai | राज्यात मंगळवारी 52.68 टक्के काेराेना लसीकरण पूर्ण; १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ; सर्वाधिक लसीकरण मुंबईत

राज्यात मंगळवारी 52.68 टक्के काेराेना लसीकरण पूर्ण; १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ; सर्वाधिक लसीकरण मुंबईत

Next

मुंबई : राज्यात मंगळवारी विविध केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. दिवसभरात उशिरापर्यंत १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. या टप्प्यात लसीकरणाचे प्रमाण ५२.६८ टक्के इतके आहे.

राज्यात सर्वाधिक लसीकरण पुन्हा मुंबईत झाले असून १ हजार ५९७ लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्याखालोखाल ठाण्यात १ हजार ४३४ तर पुण्यात १ हजार ४०३ लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. दिवसभरात हिंगोलीत सर्वांत कमी १२० लाभार्थ्यांनी लसीकरण घेतले आहे. राज्यात शनिवारी ३४ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्रांमध्ये लसीकरणाचे सत्र सुरू झाले असून कोविन पोर्टलवर १७ हजार ७६२ व्हॅक्सिनेटर्स आणि ७ लाख ८५ हजार ९२७ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. लस घेतल्यानंतर गंभीर प्रतिकूल परिणाम झाल्याची घटना झाली नसून उद्यादेखील लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्यात १६ जानेवारीला झालेल्या लसीकरणात पहिल्या दिवशी १८ हजार ३३८ हून अधिक कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, हे प्रमाण ६४ टक्के इतके होते. या वेळी मुंबईत सर्वाधिक लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला होता, ही संख्या १ हजार ९२६ इतकी होती.

मुंबई महापालिकेने दररोज चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र पहिल्याच दिवशी केवळ १,९२६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देणे शक्य झाले. त्यामुळे रविवार (दि. १७) आणि सोमवारी (दि. १८) असे दोन दिवस लसीकरण मोहीम स्थगित करण्यात आली होती. मंगळवारीही या मोहिमेत फारसा फरक जाणवला नाही.आठशे डुप्लिकेट नावे यादीमधून काढल्यानंतर महापालिकेने मंगळवारी ३,२०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केंद्रांवर बोलावले होते. मात्र यापैकी १,५९७ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. सर्वाधिक परळ येथील केईएम रुग्णालयात ३०७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली; तर जे. जे. रुग्णालयात सर्वांत कमी म्हणजे १३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दोन दिवसांत आठ हजारांऐवजी केवळ ३५२३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात पालिकेला यश आले आहे.

तीन कर्मचाऱ्यांना किरकाेळ त्रास
मंगळवारी झालेल्या लसीकरणावेळी तीन कर्मचाऱ्यांना किरकोळ त्रास जाणवला. त्यामुळे त्यांना अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती लस दिल्यानंतरही उत्तम असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र केंद्रावर लस घेण्यासाठी कमी कर्मचारी हजेरी लावत असल्याने अद्यापही त्यांच्यात संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. 

ॲपमधील तांत्रिक अडचण कायम
लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या वेळेही गोविंद ॲपमध्ये तांत्रिक बिघाड कायम असल्याने पालिका अधिकारी हैराण आहेत. आठशे नाव दोनवेळा आल्याचे समोर आल्यानंतर एकाच विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावले जात असल्याचेही उजेडात आले. याकडे महापालिकेने राज्य सरकार लक्ष वेधले आहे.

कंसात लसीकरण झालेले कर्मचारी : अकोला (१८१), अमरावती (२३९), बुलडाणा (३५९), वाशिम (२१२), यवतमाळ (२८९), औरंगाबाद (३३५), हिंगोली (१२०), जालना (२३१), परभणी (२२९), कोल्हापूर (५४५), रत्नागिरी (२४५), सांगली (४३२), सिंधुदुर्ग (१६१), बीड (१४२), लातूर (२२१), नांदेड (२७६), उस्मानाबाद (२३८), मुंबई (५९५), मुंबई उपनगर (१००२), भंडारा (२०६), चंद्रपूर (३९९), गडचिरोली (१८७), गोंदिया (१४४), नागपूर (६५६), वर्धा (३८६), अहमदनगर (६५०), धुळे (३१३), जळगाव (३९७), नंदुरबार (२८५), नाशिक (७१०), पुणे (१,४०३), सातारा (५११), सोलापूर (६८१), पालघर (३१९), ठाणे (१,४३४), रायगड (१५०).

आठशे नाव डुप्लिकेट असल्याने ३२०० कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले. यापैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये लसीबाबत भीती असल्याचे बोलता येणार नाही.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी

Web Title: The state completed 52.68 per cent Corona vaccination on Tuesday; Most vaccinations in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.