‘मुख्यमंत्री’ जाहिरातीवरून प्रदेश काँग्रेसला नोटीस
By admin | Published: October 5, 2014 01:56 AM2014-10-05T01:56:04+5:302014-10-05T01:56:04+5:30
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असूनही पृथ्वीराज चव्हाण अजूनही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे भासविणारी निवडणूक प्रचाराची जाहिरात टीव्ही वाहिन्यांवर दाखविली
Next
>मुंबई: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असूनही पृथ्वीराज चव्हाण अजूनही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे भासविणारी निवडणूक प्रचाराची जाहिरात टीव्ही वाहिन्यांवर दाखविली जात असल्याबद्दल मुख्य निवडणूक अधिका:यांनी प्रदेश काँग्रेसकडून खुलासा मागविला आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी सांगितले की, या जाहिरातीबद्दल आमच्याकडे तक्रारी आल्याने आम्ही प्रदेश काँग्रेसला त्याबाबत खुलासा करण्यास सांगितले आहे. जोगेश्वरी (पू.) मतदारसंघातून निवडणूक लढविणारे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यासह तिघांनी या विषयी तक्रार केली होती. (प्रतिनिधी)
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यापूर्वी आम्ही ही जाहिरात तयार केली होती. त्यात पृथ्वीराज चव्हाण अद्यापही मुखयमंत्री असल्याचे म्हटलेले नाही. चव्हाण यांची स्वाक्षरी दाखविली असून त्याखाली ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख आहे. यानेही निवडणूक नियमांचे उल्लंघन होते का याचा आम्ही अभ्यास करू.
-अनंत गाडगीळ,
प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस