राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 04:03 PM2020-01-28T16:03:55+5:302020-01-28T16:04:36+5:30

जग वेगाने पुढे जात आहे. विकासाचा वेग वाढला आहे. विकासात राजकारण न करता राज्यात विकासाची कामे त्याच वेगाने करायची आहे.

The state development will run like a metro by uddhav thackeray | राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास

राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास

Next
ठळक मुद्देजग वेगाने पुढे जात आहे. विकासाचा वेग वाढला आहे. विकासात राजकारण न करता राज्यात विकासाची कामे त्याच वेगाने करायची आहे.विकास करताना कामाचे श्रेय घ्यायचे नाही. हे सरकार माझे नव्हे तर आपले आहे.

नागपूर : जग वेगाने पुढे जात आहे. विकासाचा वेग वाढला आहे. विकासात राजकारण न करता राज्यात विकासाची कामे त्याच वेगाने करायची आहे. विकास करताना कामाचे श्रेय घ्यायचे नाही. हे सरकार माझे नव्हे तर आपले आहे. केवळ जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोच्या वेगाने धावणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत लोकमान्यनगर ते सीताबर्डी इंटरचेंजपर्यंतच्या ११ किमीच्या अ‍ॅक्वा लाइनचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ लिंकद्वारे मंगळवारी सुभाषनगर स्टेशनवर करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जा व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. विकास ठाकरे, आ. समीर मेघे, आ. मोहन मते, आ. प्रकाश गजभिये, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्रा, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित उपस्थित होते. 

विकासासाठी एकाच स्टेशनवर एकत्र : उद्धव ठाकरे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, एका गाडीत एकत्र आलो नसलो तरी स्टेशनवर मात्र एकत्र आलो आहोत. एकमेकांचा हात, कामाची साथ आपण कधीही सोडणार नाही. भाषण करीत असताना त्या विषयाचा अभ्यास असावा लागतो. अभ्यासपूर्ण भाषण करणारे गडकरी यांच्यासारखे मंत्री राज्यातच नव्हे, तर देशातही दुर्मीळ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील मुंबई-पुणे महामार्गाचे काम त्यांनी वेळेपूर्वीच पूर्ण केले. गडकरी यांनी दिलेला शब्द पाळला होता, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाला त्वरित मंजुरी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: The state development will run like a metro by uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.