राज्य शासनाकडे धाडस नाही- अजित पवार

By admin | Published: May 16, 2016 12:55 AM2016-05-16T00:55:02+5:302016-05-16T00:55:02+5:30

शेतकरी अडचणीत सापडला असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस निर्णय घेण्याचे धाडस सरकारमध्ये नाही

State does not have the courage - Ajit Pawar | राज्य शासनाकडे धाडस नाही- अजित पवार

राज्य शासनाकडे धाडस नाही- अजित पवार

Next

येरवडा : न्यायालयाने राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केला. राज्य सरकारसाठी ही अतिशय शरमेची बाब आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस निर्णय घेण्याचे धाडस सरकारमध्ये नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
बंडगार्डन येथे मुळा-मुठा नदीवरील ‘वॉकिंंग प्लाझा’, येरवड्यातील प्रभाग १५मधील २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व अनुसया बापू सावंत शाळेचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, कमल ढोले-पाटील, नगरसेवक बाबू वागसकर, मंगेश गोळे, नगरसेवक किशोर विटकर, सुनील गोगले, अनिल टिंंगरे, सतीश म्हस्के, रेखा टिंंगरे, उषा कळमकर, मीना परदेशी, अ‍ॅड. नानासाहेब नलावडे, आयुक्त कुणाल कुमार, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्याम ढवळे, चित्रकार मिलिंद शिंपी उपस्थित होते.
शहरात भाजपाचे ८ आमदार असताना मेट्रो प्रकल्प, विमानतळ, भामा आसखेड अशा अनेक योजना रखडल्या आहेत. युती सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार भामा-आसखेड योजनेला विरोध असे दुटप्पी राजकारण करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

Web Title: State does not have the courage - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.