राज्य नाट्य स्पर्धा रत्नागिरीत
By admin | Published: October 21, 2014 09:36 PM2014-10-21T21:36:36+5:302014-10-21T23:40:49+5:30
सांस्कृतिक संचालनालय : १२ नोव्हेंबरपासून होणार प्रारंभ
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईतर्फे ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस दि.१२ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे या स्पर्धा होणार असून जिल्ह्यातील एकूण १८ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. गेल्यावर्षीही ही स्पर्धा रत्नागिरीत झाली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता सांस्कृतिक कला संचालनालयाने याहीवर्षी रत्नागिरीत ही स्पर्धा आयोजित केली आहे.दररोज सायंकाळी ७ वा.नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे. १२ रोजी ‘मेला तो शेवटचा होता’ (अजिंक्यतारा थिएटर्स, गणेशगुळे), दि. १३ रोजी ‘महाभारत अग्निकांड’ (आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ, विश्वनगर), दि.१४ रोजी ‘लेकुरे उदंड झाली’ (बाबा वर्दम थिएटर्स,कुडाळ), दि. १५ रोजी ‘चांदणवेल’ (कोकण मराठी साहित्य परिषद, लांजा) सादर करणार आहेत.दि.१७ रोजी ‘काळोख देत हुंकार’ (महाकाली रंगविहार, नाणिज), दि१८ रोजी ‘काळोख देत हुंकार’(नेहरू युवा आॅल मुव्हमेंटस् आॅर्गनायझेशन, धुंदरे), दि.१९ रोजी ‘गोष्ट एका शाळेची’(ओम साई मित्र मंडळ, नाचणे), दि.२० रोजी ‘सुखांशी भांडतो आम्ही’ (साईकला क्रिडा मंच, कुडाळ) ही नाटके सादर होणार आहेत. दि.२१ रोजी ‘लोककथा ७८’ (संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ), दि.२२ रोजी ‘प्यादी’ (संकल्प कलामंच, मारूतीमंदिर), दि.२३ रोजी ‘तुझ्याविना’ (क्षितीज नाट्यसंस्था, बाणखिंड), दि.२४ रोजी ‘सुखांशी भांडतो आम्ही’ (श्रीरंग नाट्यसंस्था, नाचणे), दि.२५ रोजी ‘खेळ’ (स्टार थिएटर्स, आदर्शनगर), दि.२६ रोजी ‘द इंटरपिटर’ (सांस्कृतिक कलामंच, देवरूख), दि.२७ रोजी ‘पुन्हा एकदा वसंत’(जुगाई कलामंच कोसुंब), दि.२८ रोजी कर्मभोग (सुमती थिएटर्स, तांबटआळी), दि.२९ रोजी ‘तुका अभंग अभंग’ (उत्कर्ष युवा मंडळ सावंतवाडी) अशी नाटके सादर करण्यात येणार आहे.
राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील १४ नाट्यसंस्था नाटक सादर करणार असून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील केवळ ४ संस्था स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता रत्नागिरी, लांजा, देवरूख, संगमेश्वर येथील ४ तर दस्तुरखुद्द रत्नागिरी शहरातील १० संस्था स्पर्धेत सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)
अठरा नाटकांचे होणार सादरीकरण
दररोज सायंकाळी ७ वाजता होणार नाटकांचे सादरीकरण.
रत्नागिरी जिल्ह्यातील १४ नाट्यसंस्थांचाही सहभाग.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ४ नाट्यसंस्था होणार सहभागी.