राज्य गारठले; अहमदनगर @ ९़५
By admin | Published: November 9, 2016 05:16 AM2016-11-09T05:16:53+5:302016-11-09T05:16:53+5:30
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या भागात थंडीची लाट जाणवत असून, अहमदनगर आणि पश्चिम मध्य प्रदेशातील बैतूल येथे मंगळवारी देशातील नीचांकी ९़५ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले आहे़
पुणे : मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या भागात थंडीची लाट जाणवत असून, अहमदनगर आणि पश्चिम मध्य प्रदेशातील बैतूल येथे मंगळवारी देशातील नीचांकी ९़५ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले आहे़
देशभरातील अनेक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली असून उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कोकण आणि गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, रायलसीमा,
कर्नाटक येथील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे़ कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे़ अहमदनगर येथे गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून, मंगळवारी सकाळी सरासरीच्या तुलनेत ६़४ अंश सेल्सिअसने पारा उतरला होता़ मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे किमान तापमान २़५ पासून ४़५ अंश सेल्सिअसने घटले आहे़ कोकणातील पाराही २़८ ते ५़२ अंश सेल्सिअसने खाली आला आहे़ अहमदनगरमध्ये यापूर्वी २२ नोव्हेंबर २००७ ला ७ अंश सेल्सिअस, तर १९ नोव्हेंबर २०१२ ला ७़४ अंश सेल्सिअस, ८ नोव्हेंबर २०११ ला ९ अंश सेल्सिअस आणि २७ नोव्हेंबर २००८ ला ९़३ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदविले गेले आहे़ (प्रतिनिधी)
प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे १०़८, जळगाव १२़,कोल्हापूर १६़६, महाबळेश्वर १३़८, मालेगाव १३़८़, नाशिक ११़६, सांगली १४़५, सातारा १३़६, सोलापूर १५़५, मुंबई २२़७, अलिबाग १८़८, रत्नागिरी १८़९, पणजी २०़़६, डहाणु २०़६़, उस्मानाबाद १०़९, औरंगाबाद १५़४, परभणी १३़८, नांदेड १५़५, अकोला १३़९, अमरावती १३़२, बुलढाणा १६़४, ब्रम्हपुरी १५़८, चंद्रपूर १५़२़, गोंदिया १३़१, नागपूर १२, वाशिम १७़५, वर्धा १३़५, यवतमाळ १३़़