राज्य गारठले; निफाडमध्ये हिमकण; धुळे २.२ अंशांवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 06:31 AM2018-12-30T06:31:36+5:302018-12-30T06:31:40+5:30

थंडीची लाट आल्याने महाराष्ट्र गारठला आहे. लातूर जिल्ह्यात थंडीने एकाचा बळी घेतला तर महाबळेश्वरसह नाशिकमधील निफाड परिसरात हिमकण आढळून आले. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज आहे.

 The state is frozen; Snowflake in Nifad; Dhule is at 2.2 degrees! | राज्य गारठले; निफाडमध्ये हिमकण; धुळे २.२ अंशांवर!

राज्य गारठले; निफाडमध्ये हिमकण; धुळे २.२ अंशांवर!

Next

मुंबई/ पुणे : थंडीची लाट आल्याने महाराष्ट्र गारठला आहे. लातूर जिल्ह्यात थंडीने एकाचा बळी घेतला तर महाबळेश्वरसह नाशिकमधील निफाड परिसरात हिमकण आढळून आले. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज आहे.
नागपूरमध्ये ८१ वर्षांचा विक्रम मोडीत ३.५ अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली, तर धुळ्यात २.२ इतक्या तापमानाची नोंद झाली. विदर्भात जीवघेणा गारठा आहे. लातूर, परभणी, नाशिक येथेही विक्रमी नीचांकी तापमान नोंदले गेले. उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू-काश्मीर तसेच राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्येही तापमान शून्याखाली गेले आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाºयांमुळे महाराष्ट्र गारठला आहे.
एकाचा गारठून बळी
लातूरच्या तेरणा खोºयातही कमालीचा गारठा असून, लातूरमधील तापमान ४ अंशांवर आले. सावरी (ता़ निलंगा) येथील व्यंकट बाजीराव जाधव या ६२ वर्षीय शेतकºयाचा गारठून मृत्यू झाला. थंडीचा कडाका पिकांना बाधला असून, दव पडल्याने पिकांची फुलगळ झाली आहे़ पिकांची वाढ खुंटली आहे़ द्राक्ष बागांच्या मण्याला तडे जाऊन वाढ खुंटली आहे़

कोलकास व्हॅलीत बोचरी थंडी
मेळघाटातील कोलकास-सेमाडोह व्हॅलीत बोचºया थंडीने कहर केला आहे. चिखलदरा व कुकरूत रात्रीचे तापमान ४ डिग्री सेल्सिअसवर आले असून दवबिंदू गोठू लागले आहेत. आलाडोह-मोथ्याकडे जाणाºया रस्त्यावरील खोलगट भागातून वाहणाºया ब्रह्मसती नदीलगतच्या भागात दवबिंदू गोठत आहेत.

महाबळेश्वरात दुसºया दिवशीही हिमकण
महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाºया महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. तिथे सलग दुसºया दिवशी दवबिंदू गोठले. वेण्णा तलाव ते लिंगमळा परिसरात सुमारे दोन अंश सेल्सिअस एवढे नीचांकी तापमान होते.

नाशिकमध्येही कहर
नाशिकमध्ये हंगामातील सर्वाधिक नीचांकी ५.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले, तर निफाड तालुक्यात ३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली घसरला. निफाड परिसरात अनेक ठिकाणी
दवबिंदू गोठले होते. खान्देशातही थंडीचा कडाका कायम आहे. कडाक्याच्या थडीने द्राक्ष तसेच केळी बागायतदारांची चिंता वाढली आहे.

Web Title:  The state is frozen; Snowflake in Nifad; Dhule is at 2.2 degrees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.