राज्य शासनाकडून 2019 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर; दै. लोकमतच्या चार पत्रकारांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 03:55 PM2021-08-14T15:55:07+5:302021-08-14T15:55:27+5:30

Best Journalism Award, 2019 By Maharashtra: मुंबईत एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

State Government announces 2019 Best Journalism Award; Honoring four journalists of Lokmat | राज्य शासनाकडून 2019 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर; दै. लोकमतच्या चार पत्रकारांचा सन्मान

राज्य शासनाकडून 2019 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर; दै. लोकमतच्या चार पत्रकारांचा सन्मान

Next

मुंबई : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2019 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दै. लोकमतच्या चार जणांना हे पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिले जाणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले.

मुंबईत एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. लोकमतचे पत्रकार सचिन लुंगसे यांना आचार्य अत्रे पुरस्कार, मनोज शेलार यांना दादासाहेब पोतनीस पुरस्कार, योगेश पांडे यांना ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांना तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

पुरस्कार खालीलप्रमाणे :

  • बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)- संदीप काळे, संपादक, दै.युथ सकाळ. मुंबई.
  • अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) अंजया अनपरती, विशेष प्रतिनिधी, दै. टाइम्स ऑफ इंडिया. नागपूर
  • बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) झ्र राजन पारकर, वार्ताहर, दै. दोपहर का सामना. मुंबई
  • मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) झ्र फरहान हनीफ, उपसंपादक, दै. उर्दू न्यूज, मुंबई.
  • यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर) झ्र प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर.
  • पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)- वेदांत नेब, प्रतिनिधी, एबीपी माझा, मुंबई.
  • तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)- प्रशांत खरोटे, वरिष्ठ छायाचित्रकार, दै. लोकमत, नाशिक.
  • केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर)- रोहीत कांबळे, छायाचित्रकार, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर.
  • सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर)- राहुल झोटे, संपादक, सिंदखेड राजा मिरर.इन (वेब), बुलढाणा.
  • स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)- प्रतिभा राजे, उपसंपादक, दै. पुढारी, सातारा.
  • पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार- रोहिणी खाडिलकर- पोतनीस, संपादक, दै. संध्याकाळ, मुंबई. (51 हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
  • दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग- मनोज शेलार, वरिष्ठ उपसंपादक, दै. लोकमत, नंदुरबार, नाशिक.
  • अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह)- महेश जोशी, विशेष प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, औरंगाबाद.
  • आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग सचिन लुंगसे, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकमत, मुंबई.
  • नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग  चैत्राली चांदोरकर, वरिष्ठ पत्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, पुणे
  • शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग झ्र हर्षद कशाळकर, जिल्हा प्रतिनिधी, दै. लोकसत्ता, रायगड.
  • ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग झ्र एकनाथ नाईक, उपसंपादक, दै. पुढारी, कोल्हापूर.
  • लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग  जयंत सोनोने, वार्ताहर, दै. दिव्य मराठी, अमरावती.
  • ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग योगेश पांडे, उपमुख्य उपसंपादक-वार्ताहर, दै. लोकमत, नागपूर.
     

2019 च्या पुरस्कार निवडीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत पत्रकार नरेंद्र कोठेकर, विद्याधर चिंदरकर, रेनी अब्राहम, इंद्रकुमार जैन, शेख मोहम्मद अस्लम, रश्मी पुराणिक, रवींद्र आंबेकर, अशोक पानवलकर, अरुण कुलकर्णी, संचालक (माहिती)  यांचा समावेश होता.

Read in English

Web Title: State Government announces 2019 Best Journalism Award; Honoring four journalists of Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.