राज्य सरकारकडून पुरस्काराची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:10 AM2018-06-29T05:10:51+5:302018-06-29T05:10:59+5:30
महाराष्ट्र राज्य सरकारने राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांना पुरस्कार देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्यातील सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये दिले जाईल.
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांना पुरस्कार देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्यातील सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये दिले जाईल. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते तेजस्विनी सावंत, हीना सिद्धू (नेमबाजी), राहुल आवारे (कुस्ती), मधुरिका पाटकर, पूजा सहस्त्रबुद्धे, सानिल शेट्टी (टेबल टेनिस), चिराग शेट्टी (बॅडमिंटन) यांना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्यात येतील. त्यासोबतच तेजस्विनी, हीना व चिराग यांनी रौप्य ही पटकावले होते. त्यांना ३० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल.
तेजस्विनीने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सुवर्ण व ५० मीटर रायफल प्रोनमध्ये रौप्य जिंकले होते. हीनाने २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण व १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्य पटकावले. चिरागने दुहेरीत रौप्य, तर मिश्र स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. कांस्य विजेत्या सानिल शेट्टीला २० लाख रुपये देण्यात येतील. त्यानेसुवर्ण व कांस्य मिळवले होते.