राज्य शासनाचे कृषी पुरस्कार जाहीर

By admin | Published: August 10, 2014 01:37 AM2014-08-10T01:37:08+5:302014-08-10T01:37:08+5:30

विदर्भातील ८ शेतकर्‍यांचा समावेश

State Government Annual Agricultural Award | राज्य शासनाचे कृषी पुरस्कार जाहीर

राज्य शासनाचे कृषी पुरस्कार जाहीर

Next

अकोला: कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या राज्यातील ७२ शेतकरी व कृषी संस्थांना राज्य शासनाचे कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कार जाहीर झालेल्या शेतकर्‍यांमध्ये विदर्भातील आठ शेतकर्‍यांचा समावेश आहे. पुरस्कारांची घोषणा ८ ऑगस्ट रोजी करण्यात आली. महराष्ट्र शासन दरवर्षी, राज्यात कृषी, कृषी संलग्न व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शेतकरी व संस्थांना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती, वसंतराव नाईक शेतीमित्र, शेतीनिष्ठ व उद्यानपंडित इत्यादी कृषी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करीत असते. यावर्षीचा कृषिरत्न पुरस्कार पुणे जिल्ह्यातील वारू ळवाडी येथील अनिल मेहरे यांना जाहीर झाला आहे. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातील काराव येथील रमेश देशमुख, नाशिक जिल्ह्यातील खेडगाव येथील शरदराव ढोकरे, जळगाव येथील गो विज्ञान संशोधन व बहूद्देशीय संस्था, पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथील महादेव शेंडकर, पुणे जिल्ह्यातीलच आर्वी येथीलश्रीराम गाढवे, सोलापूर जिल्ह्यातील पेनूर येथील परमेश्‍वर राऊत, अहमदनगर जिल्ह्यातील वाळूंज येथील सबाजीराव गायकवाड, सांगवी भुसार येथील विजय जाधव व वीरगाव येथील रामनाथ वाकचौरे, कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथील संजय पाटील, सांगली जिल्ह्यातील आरग येथील राजेंद्र हांडे, औरंगाबाद जिल्ह्यातील बहिरगाव येथील पोपटराव दापके, हिंगोली जिल्ह्यातील पार्डी बुद्रुक येथील विजय नरवाडे, लातूर जिल्ह्यातील ईट येथील अशोक देशमुख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरपुरा येथील पांडुरंग आवाड यांना जाहीर झाला आहे. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार मिलन राणे (खारपाळे, रायगड), चंद्रकला वाणी (वणी,धुळे), सुजाता थेटे (निमगाव जाळी, अहमदनगर), मीनाक्षी चौगुले (तारदाळ, कोल्हापूर) व वैजयंती वझे (तमदलगे, कोल्हापूर) यांची निवड झाली आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार हेमंत सावंत (हुंबरट, सिंधुदुर्ग), बाळकृष्ण पाटील (गणपूर, जळगाव), ज्ञानेश्‍वर रायते (भवानीनगर, पुणे), अशोक तुपे (कान्हेगाव, अहमदनगर), अमोल जाधव (गोंदी, सातारा) व चेतन भैरम (भंडारा) यांना जाहीर झाला आहे. शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी एकनाथ मोरे (कांदिवली, रत्नागिरी), विजय पाटील (खंबाळा, ठाणे), उल्हास जाधव (शेणीत, नाशिक), दत्तू ढगे (बेलगाव ढगा, नाशिक), संतोष राऊत (निमगाव केतकी, पुणे), दौलत भाकरे (माळवाडी, पुणे),प्रमोद चौगुले (गडमुडशिंगी, कोल्हापूर), नागेश बामणे (सरोळी, कोल्हापूर), भिकनराव वराडे (नळणी, जालना), नामदेव जगदाळे (महाजनवाडी, बीड), नारायण चौधरी (दुधड, औरंगाबाद), भीमराव कदम (रावणगाव, नांदेड), शेषराव निरस (पडेगाव, परभणी), उत्तमराव भोसले (शेंबोली, नांदेड), ज्ञानेश्‍वर गायकवाड (पिरडा, बुलडाणा), गजानन शेतकरी सहाय्यक गट (कोंडाळा झामरे, वाशिम) प्रदीप तेलखेडे (बहाद्दरपूर, अमरावती), चोपराम कापगते (सिंदीपार, गोंदिया)आणि जिजाबाई बोरकर (जाटलापूर, चंद्रपूर) या शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे. शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) तात्या हंबीर (बेंडशिळा, ठाणे), विजय पवार (कालदर, धुळे), दिलीप सूर्यवंशी (वाठोडा, नाशिक), नाना पावरा (चोंदवाडे, नंदूरबार), लक्ष्मीकांत रेंगडे (खामगाव, पुणे), गजानन कळंबे (बान्सी, यवतमाळ), कुंजीलाल कुंभरे (उसरीपार, नागपूर) या शेतकर्‍यांना जाहीर झाला आहे. कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कारासाठी आनंद गायकवाड (दहागाव, ठाणे), भीमराव बोरसे (आमरी, धुळे), सदाशिव शेळके (मानोरी, नाशिक), नामदेव साबळे (भालेवाडी, सोलापूर), शैलजा नावंदर (उमरी बाळापूर, अहमदनगर), डॉ. प्रताप पाटील (ऐतवडे, सांगली), केदार जाधव (निरखेडा, जालना) आणि शिवदास कोरे (किरमिटी मेंढा, चंद्रपूर) यांची निवड झाली आहे. जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठान या संस्थेलाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्यानपंडित या पुरस्कारासाठी डॉ. मकरंद आठवले (नागाव, रायगड), प्रवीण पाटील (फरकांड, जळगाव), भीमराव गाजरे (इनामगाव, पुणे), राजकुमार आठमुठे (तमदलगे, कोल्हापूर), विष्णू अंबेकर (तेलवाडी, औरंगाबाद), दत्तप्रसाद उर्फ राजेंद्र मुंदडा (शिराढोण, उस्मानाबाद), महादेव भोयर (सोयता, वाशिम) आणि नागोराव टोंगे (धामणा-लिंगा, नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे. क्रांतिंदिनानिमित्त शहिदांना आदरांजली खामगाव : शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानात ९ ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त सामूहिक प्रार्थना सभा व शहीदांना आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी आ.दिलीपकुमार सानंदा, नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, न.प. उपाध्यक्ष वैभव डवरे, माजी नगराध्यक्षा सौ.सरस्वतीताई खासणे, लोकमित्र गाडेकर गुरुजी, जि.प. सदस्य शांताराम पाटेखेडे व सुरेशसिंह तोमर, माजी जि.प. सभापती सुरेश वनारे, काँग्रेसचे शहर सचिव अशोक मुळे, पं.स. सदस्य सज्जादउल्लाखॉ, नगरसेवक सुनील जयपुरीया, अमोल बिचारे, लाला जमदार, पं.स. सभापती सतिश चव्हाण, कृउबास मुख्य प्रशासक पंजाबराव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आ. दिलीपकुमार सानंदा यांच्याहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहीदांच्या पावन स्मृतीस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी अन्सार भाई, मनोज पाटील, गौरव चौधरी, नारायण पाटील, दिलीप पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: State Government Annual Agricultural Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.